For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वनडेचा राजा रोहित शर्मा

06:44 AM Oct 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
वनडेचा राजा रोहित शर्मा
Advertisement

आयसीसी क्रमवारीत अव्वलस्थानी झेप : गिलची तिसऱ्या स्थानी घसरण

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील प्रभावी कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वलस्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे सध्याचा भारतीय संघाचा एकदिवसीय कर्णधार शुभमन गिलला मागे टाकून रोहित शर्माने पहिले स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, शुभमन गिलची मात्र तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

Advertisement

रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या मालिकेत त्याने सर्वाधिक धावा केल्या. याच कमागिरीचा रोहितला फायदा झाला असून तो आतापर्यंतच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच आयसीसी वनडे क्रमवारीत त्याने अव्वल स्थान पटकावले आहे. आयसीसी एकदिवसीय फलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा रोहित शर्मा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरने पहिल्यांदा आयसीसी एकदिवसीय फलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते. त्यानंतर एमएस धोनीनेही अव्वल स्थान पटकावले होते. विराट कोहलीने बराच काळ एकदिवसीय फलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थान राखून ठेवले होते. त्यानंतर शुभमन गिलने खूप कमी वेळात अव्वल स्थान पटकावले. आता रोहित शर्माने शुभमन गिलला मागे टाकत बाजी मारली आहे.

गिलची तिसऱ्या स्थानी घसरण, विराट सहाव्या स्थानी

टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची मात्र तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.  ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत त्याची कामगिरी सुमार झाली, याचा त्याला फटका बसला आहे. गिल 745 गुणासह तिसऱ्या स्थानी आहे. याशिवाय, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने 74 धावा केल्या, पण तरीही तो एका स्थानाने घसरला. तो आता 725 रेटिंग गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला एका स्थानाचा फायदा झाला असून तो आता नवव्या स्थानी आला आहे. याशिवाय, केएल राहुल 14 व्या स्थानी आहे.

राशिद खान एकदिवसीय सामन्यांमध्ये अव्वल गोलंदाज

आयसीसीच्या गोलंदाजीत क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोस हेझलवूड दोन स्थानांचा फायदा झाला असून तो आता 8 व्या स्थानी आहे. याशिवाय, टॉप -10 मध्ये केवळ एकच भारतीय गोलंदाज आहे. कुलदीप यादव सातव्या स्थानी विराजमान आहे. तसेच भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चार बळी घेणारा फिरकी गोलंदाज अॅडम झम्पा देखील दोन स्थानांनी पुढे सरकला आहे (आता 12 व्या स्थानावर). दरम्यान, अफगाणिस्तानचा अष्टपैलू राशिद खान गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. द.आफ्रिकेचा केशव महाराज दुसऱ्या स्थानी असून लंकेचा थिक्षणा तिसऱ्या स्थानी आहे.

Advertisement
Tags :

.