राष्ट्रकुल स्पर्धेत रोहित राजपाल भारताचे पथक प्रमुख
06:38 AM May 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
Advertisement
ग्लास्गो येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय पथकाच्या प्रमुखपदी डेव्हिस चषक संघाचा कर्णधार रोहित राजपालची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर माहिती अखिल भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
सदर राष्ट्रकुल स्पर्धा 23 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय पथकाच्या उपप्रमुखपदी रवी बेंगानीची नियुक्ती करण्यात आली आहे. या स्पर्धेत वंदना राव आणि राहुल स्वामी हे भारतीय पथकाचे सरव्यवस्थापक म्हणून राहतील. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा या स्पर्धेसाठी भारताच्या वरिष्ठ प्रतिनिधी मंडळासमवेत राहतील. तसेच भारतीय पथकासमवेत सीईओ रघुराम अय्यर आणि विघ्नेश उज्वल यांचाही समावेश राहिल.
Advertisement
Advertisement