Ajit Pawar | रोहित पवार यांचा बारामती ठाण्यावर मोर्चा;
बारामतीत रोहित व युगेंद्र पवारांनी पोलीस ठाण्यात अर्ज दिला
पुणे -महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू प्रकरणी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि नेते युगेंद्र पवार यांनी गुरुवारी बारामती शहर पोलीस ठाण्यात धडक देत, या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते.
सुमारे १०० वकिलांच्या उपस्थितीत पवार बंधूंनी पोलीस प्रशासनाकडे आपला अर्ज सुपूर्द केला. हा अपघात नसून घातपाताचा संशय असल्याचे सांगत, नागरी विमान वाहतूक संचालनालय आणि अपघातग्रस्त विमानाचे संचालन करणाऱ्या 'व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध आणि विमान नियोजनाची जबाबदारी असलेल्या 'रो' नावाच्या कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
रोहित पवार प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, २४ फेब्रुवारी रोजी डीजीसीएने एक अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये व्हीएसआर कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या सिद्ध होत आहे.