For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Rohit Pawar Hunger Strike | Rohit Pawar Strike | रोहीत पवारांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित? CM फडणवीसांचा फोन आला..

12:02 PM Jun 15, 2026 IST | NEETA POTDAR
rohit pawar hunger strike   rohit pawar strike   रोहीत पवारांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित  cm फडणवीसांचा फोन आला
Advertisement

पंढरपूर: शेतकरी कर्जमाफीच्या जीआरमध्ये बदल करावेत या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात सुरू केलेले तीन दिवसांचे अन्नत्याग आंदोलन अखेर मागे घेतले आहे.मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर रोहित पवारांनी आपले आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला... ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळाला भेट देऊन रोहित पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

Advertisement

यामुळे रोहीत पवांरानी घेतले मागे..

चर्चेदरम्यान गिरीश महाजन यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधुन दिला, यानंतर मुख्यमंत्र्यांनी रोहीत पवार यांच्यासोबत फोनवर सकारात्मक चर्चा केली फोनवर मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर रोहित पवारांनी आपले आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला,२२ जून रोजी सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत या विषयावर एक विशेष बैठक होणार असल्याचे रोहित पवारांनी सांगितले. ३० जूनपासून कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होत असल्याने, त्यापूर्वीच नियमात आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे....

Advertisement

या बैठकीत राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर, ठाकरे गटाचे प्रतिनिधी, शेकापचे जयंत पाटील आणि महादेव जानकर या सर्व प्रमुख शेतकरी नेत्यांना निमंत्रित करावे, असा प्रस्ताव रोहित पवारांनी मांडला आहे. अखेर या मागण्या मान्य झाल्यावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन रोहित पवारांनी उपोषण सोडले.

दरम्यान, कर्जमाफीतील दोन जाचक अटींवर योग्य तोडगा निघाला नाही, तर ४ जुलैपासून मराठवाड्यात पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तीन दिवसांच्या उपोषणामुळे रोहित पवारांची प्रकृती खालावली होती; त्यांचे बीपी आणि शुगर लेव्हल कमी झाली होती. डॉक्टरांनी सलाईन लावण्याचा सल्ला दिला होता, मात्र मंत्री महाजन आल्यानंतरच उपचार घेण्यावर ते ठाम होते. अखेर रात्री सव्वा दहा वाजता गिरीश महाजन आंदोलनस्थळी पोहोचले आणि त्यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन रोहित पवारांनी उपोषण सोडले.

Advertisement
Tags :

.