For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार? राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा दावा अन् महाराष्ट्रात खळबळ

04:33 PM May 14, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार  राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा दावा अन् महाराष्ट्रात खळबळ
Rohit pawar
Advertisement

Sunil Shelake aligations against Rohit Pawar | दोनच दिवसांपुर्वी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली अन् महाराष्ट्राच्या राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आलं.. या भेटीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. या भेटीचं गूढ काय असेल? याची चर्चा राजकिय क्षेत्रासोबतच जनमानसातही रंगली. 

Advertisement

या वेगवान घडामोडी घडत असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि अजित पवारांच्या अतिशय जवळचे मानले जाणाऱ्या सुनील शेळके यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. रोहित पवार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारी असल्याचा दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

सुनील शेळके म्हणाले, "रोहित पवार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. 2029 ची निवडणूक रोहित पवार काँग्रेस पक्षातून बारामतीमधून लढवणार आहेत. रोहित पवार दिल्लीत जाऊन राहुल गांधींना भेटले आहेत ते काँग्रेसमध्ये जाण्यास तयार आहेत. जर मी बोलतो ते खरं नसेल तर रोहित पवारांनी पुढे येऊन सांगावं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तर मी पक्ष सोडणार नाही".
सुनिल शेळकेंचा आरोप
बारामतीत अजित पवार यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत रोहित पवारांनीच सुनेत्रा वहिनींच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार द्यावा अशी मागणी केल्याचा गौप्यस्फोट सुनील शेळके यांनी केला आहे.
विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना शेळके म्हणाले "विलिनीकरण करायचं म्हणजे कुणीतरी चर्चा करायला हवी, कोणत्या पक्षाचा कोणत्या पक्षात करायचं हे त्यांनी येऊन चर्चा करायला हवी...
रोहित पवारांनी स्वतःच्या पक्षाचं वाटोळे केलं आता ते दुसऱ्याच्या पक्षात लक्ष घालत आहे. रोहित पवार यांनी त्यांचा तुतारी हा पक्ष संपवला, असे म्हणत आमदार सुनील शेळके यांनी रोहित पवार यांच्यावर केला आहे.
रोहित पवारांचा आरोप
2 आमदार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे भारतीय जनता पक्षातून लढणार, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला होता. केवळ तटकरेंचा भाजपप्रवेश कधी करायचा, हे ठरणं बाकी असल्याचं रोहित पवार म्हणाले होते.
तटकरेंचं नाव वगळलं आणि आरोप सुरु
राष्ट्रवादीत पक्षांतर्गत वाद सुरु असतानाच, सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात पटेल-तटकरेंची पदं वगळल्याची तांत्रिक चूक काल समोर आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रोहित पवारांनी केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहे.
Advertisement
Advertisement
Tags :

.