For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पणजी मनपा महापौरपदी पुन्हा रोहित मोन्सेरातच?

01:08 PM Mar 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
पणजी मनपा महापौरपदी पुन्हा रोहित मोन्सेरातच
Advertisement

मंडळाची पुढील आठवड्यात बैठक

Advertisement

पणजी : पणजी महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर नवनियुक्त मंडळाची पहिली बैठक पुढील आठवड्यात होणार असून त्याचवेळी महापौर, उपमहापौर यांची निवडणूक घेतली जाणार आहे. विद्यमान महापौर रोहित मोन्सेरात यांच्याच गळ्यात महापौरपदाची माळ पडणार असून विधानसभा निवडणूक 2027 पर्यंत ते महापौर रहातील आणि नंतर आमदारपदासाठी रिंगणात उतरणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून रोहित हे महापौर म्हणून कार्यरत असून सध्या तरी महापौरपदाची सूत्रे त्यांच्याकडेच देण्याचे मोन्सेरात गटाने ठवल्याची माहिती समोर येत आहे. उपमहापौरपदासाठी महिलेला संधी देण्यात येणार असून तिचे नाव अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. पणजी मनपातील एकूण 30 प्रभागांपैकी 27 जागा मोन्सेरात गटाने जिंकल्यामुळे महापौर व उपमहापौर या दोन्ही पदांवर बिनविरोध निवड होणार हे स्पष्ट आहे. उत्पल पर्रीकर गटाचे 3 उमेदवार विजयी झाल्यामुळे तो गट निवडणुकीस सामोरा जाणार नाही, हे उघड आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.