For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोहित मोन्सेरात, आगशीकर यांचे महापौर-उपमहापौरपदासाठी अर्ज

03:01 PM Mar 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
रोहित मोन्सेरात  आगशीकर यांचे महापौर उपमहापौरपदासाठी अर्ज
Advertisement

पणजी : आगामी विधानसभा निवडणूक लढवणे हे आपले लक्ष्य असून त्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे आपले महापौरपद अल्प काळाचेच असेल, असे संकेत रोहित मोन्सेरात यांनी दिले आहेत. पणजी मनपाच्या महापौरपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर ते बोलत होते. काल त्यांच्याच सोबतीने वसंत आगशीकर यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. सोमवार दि. 30 मार्च रोजी सकाळी 11 वाजता ही निवडणूक होणार आहे. आपला कार्यकाळ मर्यादित असला तरीही पणजीच्या विकासावर आपला भर असेल. त्याचबरोबर मतदारांना दिलेल्या प्रमुख आश्वासनांची पूर्तता करण्यावर आपले लक्ष केंद्रित असेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.