For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय कनिष्ठ हॉकी संघाच्या कर्णधारपदी रोहित

06:22 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय कनिष्ठ हॉकी संघाच्या कर्णधारपदी रोहित
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

हॉकी इंडियाने शनिवारी येथे युरोपच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या कनिष्ठ पुरूष हॉकी संघाची घोषणा केली असून या संघाचे नेतृत्व बचाव फळीत खेळणाऱ्या रोहितकडे सोपविण्यात आले आहे.

भारतीय कनिष्ठ पुरूष हॉकी संघ 20 ते 29 मे दरम्यान युरोपच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय कनिष्ठ हॉकी संघ 3 संघांबरोबर (बेल्जियम, जर्मनी आणि नेदरलँड्स) 5 सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय कनिष्ठ हॉकी संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी रोहितकडे सोपविण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी 20 जणांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. शारदानंद तिवारी संघाचा उपकर्णधार म्हणून राहिल.

Advertisement

या दौऱ्यात भारताचा पहिला सामना 20 मे रोजी बेल्जियम बरोबर अँटवेर्प येथे तर 22 मे ला दुसरा सामना बेल्जियम बरोबर ब्रेडा येथे खेळविला जाईल. भारताचा तिसरा सामना 23 मे रोजी नेदरलँड्समधील क्लब स्तरीय संघा बरोबर खेळविला जाणार आहे. 28 मे रोजी भारताचा चौथा सामना जर्मनी बरोबर तर पाचवा सामना 29 मे रोजी पुन्हा जर्मनी विरुद्ध होणार आहे.

भारतीय कनिष्ठ हॉकी संघ : गोलरक्षक - प्रिन्स दीपसिंग, विक्रमजीत सिंग. बचाव फळी - शारदानंद तिवारी, योगेंबर रावत, अनमोल एक्का, रोहित (कर्णधार), मनोज यादव, तालेम बार्टा. मध्यफळी - अंकित पाल, रोशन कुजुर, बिपिन बिलवारा रवी, मुकेश टोप्पो, मनमित सिंग, एच. ए. वचन. आघाडी फळी - सौरभ आनंद कुशवाह, अर्शदीप सिंग, गुरुज्योत सिंग, मोहम्मद दाद, दिलराज सिंग, गुरुसेवक सिंग.

Advertisement
Tags :

.