रोहन हरमलकर यांची 212 कोटींची मालमत्त जप्त
12:33 PM Jul 31, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : राज्यात गाजलेल्या हजारो कोटींच्या भूखंड हडप प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002 अंतर्गत सुमारे 212.85 कोटी ऊपयांच्या मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. मोठ्या भूखंड हडप प्रकरणाचा भाग म्हणून ईडीने ही कारवाई केली आहे. गोव्यात प्रमुख ठिकाणी या स्थावर मालमत्ता आहेत. मोठ्या प्रमाणात भूखंड हडप आणि बनावट रॅकेटच्या चौकशीचा भाग म्हणून दि. 28 जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यातील प्रमुख संशयित रोहन हरमलकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून एका संघटित गुन्हेगारी कट रचताना बनावट कागदपत्रांच्या आधारे या मालमत्तांवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याचा आरोप ईडीने केला आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article