For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोहन हरमलकरला न्यायालयाचा चौथ्यांदा दणका

03:48 PM Apr 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
रोहन हरमलकरला न्यायालयाचा चौथ्यांदा दणका
Advertisement

जामीन अर्ज नाकारला, जमीन हडप प्रकरण :  पुराव्यांशी छेडछाडीची शक्यता

Advertisement

पणजी : बनावट कागदपत्रांच्या आधारे राज्यातील जमिनी हडप केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार असलेला व्यावसायिक रोहन हरमलकर याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पुन्हा एकदा दणका देताना, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्याचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला आहे. आतापर्यंत उच्च न्यायालयाने आणि सत्र न्यायालयाने प्रत्येकी दोनवेळा मिळून आता हा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला आहे.

ईडीने मनी लॉन्ड्रिंग कायद्यान्वये 3 जून 2025 रोजी रोहन हरमलकर याला अटक केली होती. ईडीने गोव्यात आतापर्यंतची सर्वात मोठी छापेमारी करताना पिळर्ण, पर्वरी, दिवाडी आदी ठिकाणी छापे टाकून हणजूण, हडफडे, आसगाव परिसरातील जमिनींची बनावट कागदपत्रे तसेच सुमारे 1600 कोटींच्या स्थावर मालमत्तांचे दस्तऐवज जप्त केले होते. या छाप्यावेळी पिळर्णमधील हरमलकर यांच्या घरालाही टाळे ठोकण्यात आले होते.

Advertisement

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, जमीन हडप केल्याप्रकरणी विशेष तपास पथकाने पहिल्यांदा 2022 मध्ये हणजूण येथील सर्व्हे क्र. 426/5 मधील जमीन हडप करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पुन्हा हणजूण येथील सर्व्हे क्रमांक 444/8 मधील 2,450 चौ. मी. जमीन संदर्भात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी कॅनडा येथे स्थायिक जॉयसे एझाबेल पिंटो यांच्यातर्फे मुखत्यारपत्रधारक आंतोनियो डिकॉस्टा यांनी एसआयटीकडे तक्रार केली होती.

पुराव्यांशी छेडछाडीची शक्यता

यापूर्वी उत्तर गोवा प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयाने हरमलकरचा जामीन अज्aा& फेटाळला होता. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीचे विशेष अभियोक्ता सिद्धार्थ सामंत यांनी हरमलकर हाच जमीन हडप प्रकरणातील मुख्य असून, जामिनावर बाहेर आल्यास पुराव्यांशी छेडछाड करण्याची शक्यता व्यक्त केली. हा युक्तिवाद मान्य करून उच्च न्यायालयाने हरमलकरचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे, जमिनी हडप केल्याप्रकरणी अन्य संशयितांनी वाचण्यासाठी काही राजकारण्यांचे पाय धरण्याचे प्रयत्न सुऊ केले आहेत.

Advertisement
Tags :

.