For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रॉजर्स सुपर किंग्स, साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघ विजयी

09:57 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
रॉजर्स सुपर किंग्स  साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघ विजयी
Advertisement

विश्रुत चिट्स लिटल मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित चंदन कुंदरनाड पुरस्कृत विश्रुत चिट्स लिटल मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात रॉजर्स सुपर किंग्सने एम सी सी रॉयल्स संघाचा व साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने के आर शेट्टी किंग्स संघाचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले.  विवान भूसद, अर्जुन येळ्ळूरकर याना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात रॉजर्स सुपर किंग्स संघाने एम सी सी रॉयल्स संघाचा 9 गड्यांनी पराभव केला. रॉयल्स संघाने 16 षटकात सर्व बाद 60 धावा केल्या. त्यात दृश रायकरने 4 चौकारांसह 20, अमोघने 3 चौकारांसह 13 धावा तर निखिल अडकेने 4 चौकारांसह 17 धावा केल्या. रॉजर्स सुपर किंग्सतर्फे विवान भूसदने 3 धावात तब्बल 6 गडी बाद केले. समर्थ सी व जितिन दुर्गाई यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉजर्स संघाने 7.1 षटकात एक बाद 61 धावा करून सामना 9 गड्यांनी जिकला. शाहऊख धारवाडकरने 24, जितीन दुर्गाईने 23 धावा केल्या. रॉयल्सतर्फे नुमानने एक गडी बाद केला.

दुसऱ्या सामन्यात साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने के आर शेट्टी किंग्स संघाचा सरस धावसरासरीवर 35 धावांनी विजय मिळवला. पहिला डाव संपल्यानंतर पावसाचा प्रारंभ झाल्याने के आर शेट्टी किंग संघाला सुधारित लक्ष्य देण्यात आले होते. साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने 24. 5 षटकात सर्व बाद 153 धावा केल्या. त्यात अर्जुन येळ्ळूरकरने शानदार अर्धशतक झळकावताना 50 चेंडूत 10 चौकारांसह 59 धावा केल्या. अद्वैत चव्हाणने 3 चौकारांसह 35, हर्षित इनामदारने 15 धावा केल्या. के आर शेट्टी किंग्सतर्फे वरदराज पाटीलने 3 तर स्वयम खोत व अतिथी भोगण यांनी प्रत्येकी 2 तर खंडू पाटील व मोहम्मद अब्बास यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना के आर शेट्टी किंग्स संघाने 17.2 षटकात 7 बाद 70 धावा झाल्या असताना पावसाला प्रारंभ झाल्याने सरस धावसरासरीवर साई फार्म संघाला विजयी घोषित करण्यात आले. प्रणव जे 2 चौकारांसह 22, खंडू पाटीलने 13 तर मोहम्मद अब्बासने 11 धावा केल्या. साई फार्म स्पोर्ट्स क्लबतर्फे कनिष्क वेर्णेकरने 2, अथर्व करडी, श्लोक चडीचाल, अद्वैत चव्हाण यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रमुख पाहुणे अब्दुल रशीद मुल्ला कुतुबुद्दीन जकाती व अमित भूसद यांच्या हस्ते सामनावीर विवान भूसद आणि इम्पॅक्ट खेळाडू जितिन दुर्गाई यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे शितल तिप्पानाचे यल्लाप्पा हर्जी व विकास देसाई यांच्या हस्ते सामनावीर अर्जुन येळ्ळूरकर व इम्पॅक्ट खेळाडू अद्वैत चव्हाण यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.