For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रवासी वाहनांच्या विक्रीत दमदार वाढ

06:31 AM Mar 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रवासी वाहनांच्या विक्रीत दमदार वाढ
Advertisement

फेब्रुवारीत 4 लाख 17 हजार वाहनांची विक्री, सीयाम संघटनेची माहिती

Advertisement

मुंबई :

गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये भारतात 4 लाख 17 हजार 705 प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. ही विक्री मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये दहा टक्के अधिक असल्याची माहिती भारतीय वाहन निर्मिती संघटना (सीयाम) यांनी दिली आहे.

Advertisement

सप्टेंबरमध्ये जीएसटी दरामध्ये केलेली कपात विविध ऑटो कंपन्यांसाठी फायदेशीर ठरली आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रवासी वाहन विक्रीने नवा विक्रम प्राप्त केला आहे. दुचाकी व तिचाकी वाहन विक्रीसुद्धा सदरच्या महिन्यात सर्वोच्च पातळीवर पहायला मिळाली आहे. 18 लाख 71 हजार 406 इतक्या दुचाकी आणि 74 हजार 573 इतक्या तिचाकी वाहनांची विक्री फेब्रुवारी महिन्यात झाली होती. दोन्ही वाहनांनी अनुक्रमे 35, 29 टक्के इतकी विक्रीमध्ये वाढ नोंदवली आहे.

मारुती सुझुकी इंडिया यांनी 1 लाख 61 हजार इतक्या वाहनांची विक्री फेब्रुवारीत केली होती. मागच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत यंदाची वाढ अल्पशी आहे. महिंद्रा आणि महिंद्रा यांनी दुसऱ्या स्थानावर राहत 60018 वाहनांची विक्री करण्यात यश मिळविले. वर्षाच्या आधारावर कंपनीच्या वाहन विक्रीमध्ये 19 टक्के इतकी वाढ झाली आहे. ह्युंडाई मोटर यांनी फेब्रुवारीत 52 हजार 407 वाहनांची विक्री केली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत 9 टक्के इतकी वाढ विक्रीत दिसली आहे. टोयोटा किर्लोस्करने 30734 वाहनांची तर किया इंडियाने 27610 वाहनांची विक्री केली होती.

दुचाकी वाहन विक्रीमध्ये हिरो मोटो कॉर्प यांनी नेहमीप्रमाणे आघाडी राखली आहे. 5 लाख 16 हजार 968 दुचाकीची विक्री कंपनीने केली असून महत्त्वाचे म्हणजे मागच्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेमध्ये वाहन विक्रीचे प्रमाण 44 टक्के अधिक आहे. होंडा मोटर सायकल अँड स्कूटर इंडिया यांनी 5 लाख 13 हजार 217 वाहनांची विक्री करत दुसरे तर टीव्हीएस मोटरने 3 लाख 65 हजार 471 वाहनांसह तिसरे स्थान पटकावले होते.

Advertisement
Tags :

.