For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यंत्रमानव पर्यवेक्षक

06:13 AM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
यंत्रमानव पर्यवेक्षक
Advertisement

अलिकडच्या काळात यंत्रमानव किंवा रोबो माणसांची बरीच कामे करु लागला आहे. नेपाळमध्ये या संदर्भात एक विलक्षण प्रयोग करण्यात आला आहे. येथे एका यंत्रमानवाला परीक्षेत पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आले. या यंत्रमानवाने एका वर्गाचे पर्यवेक्षण केले. परीक्षेत उत्तरपत्रिका लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्याने लक्ष ठेवले. इतकेच नव्हे, तर विद्यार्थ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे पुरवणी उत्तरपत्रिकाही दिल्या. विद्यार्थी कॉपीसारखे प्रकार करणार नाहीत, यावर लक्ष ठेवले. अशा प्रकारे हा यंत्रमानवाला पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याचे दिसून आले. भविष्यकाळात मोठ्या प्रमाणावर हे काम यंत्रमानवांकडून करुन घेण्यात येणार आहे. मात्र, या प्रयोगाला काही लोकांनी आक्षेपही घेतल्याचे दिसून आले.

Advertisement

या प्रयोगाचा व्हिडीओही प्रसारीत होत आहे. मानवी पर्यवेक्षकापेक्षा हा यंत्रमानवी पर्यवेक्षक अधिक सजगपणे आणि बिनचूक काम करु शकतो, असे संगणक तज्ञांचे मत आहे. कारण, तो थकत नाही. त्याला बसावे लागत नाही. तसेच त्याची ‘दृष्टी’ माणसापेक्षा अधिक धारदार असते. त्यामुळे कोणताही विद्यार्थी परीक्षा केंद्रात काय करत आहे, याकडे त्याचे सूक्ष्मपणे लक्ष राहू शकते. तसेच, तो कोणत्याही विद्यार्थ्याला ‘झुकते माप‘ देण्याचा किंवा जाणूनबुजून कुठल्या तरी विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रश्न नसतो. स्वाभाविकच, तो पूर्णत: ‘नि:पक्षपाती’ असतो. यंत्रमानवी पर्यवेक्षकाचे अनेक लाभ असले तरी काही समस्याही आहेत.

नेपाळमधील या प्रयोगावर अनेकांनी भिन्न भिन्न प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. काहींच्या मते भविष्यकाळात जर परीक्षा केंद्रांचे उत्तरदायित्व यंत्रमानवांवरच सोपविण्यात आले, तर विद्यार्थ्यांना उत्तरप्रत्रिका लिहिताना नियमांचा भंग कोणत्याही प्रकारे करता येणार नाही. अलिकडे परीक्षा केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतात. पण यंत्रमानवाची दृष्टी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपेक्षाही तीक्ष्ण असते. तसेच तो सतत फिरत असल्याने केंद्राच्या कानाकोपऱ्यातही काय चालले आहे, हे त्याला दिसू शकते. त्यामुळे त्याला फसविणे शक्य होत नाही. मात्र, काहीजणांनी आक्षेप घेतला आहे. यंत्रमानवावर स्वतंत्रपणे काम सोपविणे अयोग्य, असे त्यांचे मत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.