For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोबोकॉल-अनपेक्षित कॉल्ससाठी येणार कठोर मार्गदर्शक तत्वे

07:00 AM Sep 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
रोबोकॉल अनपेक्षित कॉल्ससाठी येणार कठोर मार्गदर्शक तत्वे
Advertisement

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

मोबाईलधारकांसाठी आता रोबोकॉल आणि अनपेक्षित कॉल्सवर कठोर मार्गदर्शक तत्त्वे तयार करून स्पॅम कॉल्स थोपवण्याचा प्रयत्न भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने स्पॅम कॉलवरील विद्यमान नियमांचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि व्यावसायिक संप्रेषणाच्या व्याख्येची व्याप्ती वाढवण्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे.  ट्रायच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ऑटोडायलर किंवा रोबोकॉलसाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची आणि प्री-रेकॉर्ड केलेले संदेश किंवा मोठ्या प्रमाणात संदेश फिल्टर करण्याची तातडीने गरज आहे. अनोंदणीकृत टेलिमार्केटर विरुद्ध तक्रारींच्या पार्श्वभूमीवर स्पॅमवर आळा घालण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांमध्ये व्यापक बदल करण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

जून अखेर युटीएम विरुद्धच्या तक्रारींची संख्या 7.5 लाखांवर

गेल्या आठवड्यात दूरसंचार नियामक ट्रायने दूरसंचार कमर्शिअल कम्युनिकेशन्स कस्टमर प्रेफरन्स रेग्युलेशन, 2018 चे पुनरावलोकन करण्यासाठी एक सल्लापत्र जारी केले. या धोक्याचा मुकाबला करणे हे सरकारचे प्रमुख कायदेशीर शस्त्र आहे. या क्षणी स्पॅमचे वर्गीकरण अनसोलिसिडेड कमर्शियल कम्युनिकेशन म्हणून केले जाते जे साधारणपणे नोंदणीकृत नसलेल्या टेलीमार्केटरद्वारे पाठवले जाते. ‘जरी सध्याच्या नियमांमुळे नोंदणीकृत टेलीमार्केटर्सविरुद्धच्या तक्रारींमध्ये लक्षणीय घट झाली असली तरी, नोंदणी नसलेल्या टेलीमार्केटरद्वारे पाठवलेल्या स्पॅमचा सामना करण्यासाठी व्यापक बदल करावे लागतील,’ असे ट्रायच्या अधिकाऱ्याने सांगितले.

असा बदल होण्याची शक्यता

  • दूरसंचार ऑपरेटर ठराविक संख्येने कॉल करण्यासाठी मर्यादा सेट करू शकतात
  • दररोज संदेश पाठवू शकतात
  • विहित मर्यादेचे वारंवार उल्लंघन केल्यास त्यांची सेवा बंद केली जाऊ शकते
  • तिसऱ्या उल्लंघनावर, दोन वर्षांसाठी टेलिमार्केटिंग कनेक्शन तोडून काळ्या यादीत टाकले जाणार
  • दूरसंचार कंपन्यांनी 50 हून अधिक संस्थांना काळ्या यादीत टाकले आहे
  • विविध प्रकारच्या 2.75 लाखांहून अधिक मोबाइल नंबरची सेवा बंद केली.
Advertisement
Tags :

.