For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रॉबिन उथप्पा मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षक

06:22 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
रॉबिन उथप्पा मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षक
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारताचे माजी फलंदाज रॉबिन उथप्पा यांची इंडियन प्रीमियर लीगच्या येत्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 2007 मध्ये झालेल्या पहिल्या पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाचा भाग असलेले 40 वर्षीय उथप्पा, आयपीएलच्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळले होते.

‘आमच्या पहिल्या हंगामाचा भाग असण्यापासून ते आता अफाट अनुभवासह परत येण्यापर्यंत रॉबीनकडे खेळाची उत्तम समज, संवाद साधण्याचे उत्कृष्ट कौशल्य आणि तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी लागणारी स्पष्टता आहे. पलटनमध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे,’ असे मुंबई इंडियन्सने म्हटले आहे. मुंबई इंडियन्सने गुरुवारी गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा आणि पारस म्हाम्ब्रे, तसेच क्षेत्ररक्षण प्रशिक्षक कार्ल हॉपकिन्सन यांना पदमुक्त केले. गेल्या आठवड्यात प्रँचायझीने त्यांचे फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्ड यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. त्यांनी दीर्घकाळ या भूमिकेत असलेल्या महेला जयवर्धने यांची जागा घेतली असून, सपोर्ट स्टाफमध्ये मोठे फेरबदल केले आहेत

Advertisement

Advertisement
Tags :

.