‘द बॅटमॅन पार्ट 2’मध्ये रॉबर्ट पॅटिन्सन
‘द बॅटमॅन पार्ट 2’ चित्रपटातील रॉबर्ट पॅटिन्सनचा फर्स्ट लुक समोर आला आहे. या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून यात रॉबर्ट बॅटमॅनच्या लुकमध्ये दिसून येत आहे. टीझरमध्ये पोलिसांच्या वाहनांच्या फ्लॅशिंग लाइट्स दिसून येतात, मग हळूहळू बॅटमॅन कॅमेऱ्याच्या दिशेने वळतो असे दाखविण्यात आले आहे. अखेरीस चित्रपटाचा लोगो अन् प्रदर्शनाची तारीख दर्शविण्यात आली आहे.
या चित्रपटाची कथा अत्यंत आकर्षक आहे. हा एक अत्यंत खास अन् वेगळ्या प्रकारचा चित्रपट ठरेल असे माझे मानणे आहे. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित ‘द बॅटमॅन’पेक्षा अत्यंत वेगळ्या दिशेत जाईल. चित्रपटाकरता काही मोठे अन् नवे प्रयोग केले जात असल्याचे रॉबर्टने सांगितले आहे.
चित्रपटात ओसवाल्ड ‘ओज’ कॉबची भूमिका साकारणाऱ्या कॉलिन फॅरेलनेन देखील चित्रपटाचे कौतुक केले आहे. पटकथेवरून मी मॅटसोबत दीर्घ चर्चा केली. हा एक मास्टरपीस ठरू शकतो असे माझे मानणे असल्याचे कॉलिनने म्हटले आहे. द बॅटमॅन पार्ट 2 चित्रपट 2022 च्या चित्रपटाच्या कहाणीला पुढे नेणार आहे. यंदा देखील मॅट रीव्स दिग्दर्शन सांभाळार असून रॉबर्ट पुन्हा एकदा ब्रूस वेन/बॅटमॅनच्या भूमिकेत दिसून येईल. हा बहुप्रतीक्षित चित्रपट 18 फेब्रुवारी 2028 रोजी प्रदर्शित होणार आहे.