For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रॉबर्ट पॅटिनसन झाला पिता

06:53 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
रॉबर्ट पॅटिनसन झाला पिता
Advertisement

प्रेयसी सुकी वॉटरहाउसने दिला पुत्राला जन्म

Advertisement

हॉलिवूडची सुपरहिट फिल्म फ्रेंचाइजी ट्वालाइटद्वारे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारा अभिनेता रॉबर्ट पॅटिनसन दीर्घकाळापासून सुकी वॉटरहाउससोबत रिलेशनशिपमध्ये आहे.  सुकीने आता पुत्राला जन्म दिला आहे. रॉबर्ट अलिकडेच नवजातासोबत लॉस एंजिलिसमध्ये दिसून आला आहे. त्याचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हॉलिवूड अभिनेता पहिल्यांदाच पिता झाला आहे. सुकी आणि रॉबर्टने अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या छायाचित्रामुळे हे दोघेही पालक झाल्याचे समोर आले आहे.

Advertisement

स्वत:च्या दमदार अभिनयासाठी रॉबर्टला ओळखले जाते. अभिनेता रॉबर्ट हा हॅरी पॉटर आणि बॅटमॅन चित्रपटातही दिसून आला आहे. दीर्घकाळापासून रॉबर्टच्या बॅटमॅन 2 ची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. त्याचा हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement
Tags :

.