कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेटर मॅन’मध्ये रॉबी विलियम्स

06:34 AM Oct 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रॉबी विलियम्सच्या चाहत्यांना इतिहासातील सर्वात अजब बायोपिकचा ट्रेलर पाहता येणार आहे. स्टोक पॉप गायकाच्या प्रसिद्धीची कहाणी पुन्हा दाखविण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये बॉक्सिंग डेवर प्रदर्शित होणारा चित्रपट बेटर मॅनचे दिग्दर्शन मायकल ग्रेसी यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement

हा चित्रपट विलियम्स यांच्यावर आधारित आहे. संघर्षपूर्ण बालपणापासून टेक दॅटसोबत बॉय-बँडचे यश आणि मग सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास करणाऱ्या व्यक्तीची ही कहाणी आहे. त्याच्या 12 स्टुडिओ अल्बम्सपैकी 11 युके चार्टवर आघाडीवर राहिले होते. या चित्रपटात त्यांचे पशूपक्षी दर्शविण्यात आले आहेत. तसेच अमली पदार्थांच्या समस्येचाही उल्लेख दिसून येईल.

विलियम्सचे जीवन आणि कारकीर्दीमागील सत्य कहाणी यात सादर करण्यात आली आहे. रॉबी विलियम्स आतापर्यंतच्या सवांत महान मनोरंजनकर्त्यांपैकी एक आहे. हा चित्रपट रॉबीच्या दृष्टीकोनातून वेगळ्या प्रकारे तयार करण्यात आला आहे, ज्यात त्याची खास बुद्धी आणि अदम्य साहस दर्शविण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article