कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कर्ज फेडण्यासाठी 7.11 कोटींचा दरोडा

10:56 AM Nov 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेंगळूर दरोडा प्रकरणातील संबंधित आरोपींची कबुली : आणखी एका आरोपीची शरणागती

Advertisement

बेंगळूर : कर्ज फेडण्यासाठी आपण बेंगळुरात दिवसाढवळ्या 7.11 कोटी रुपयांचा दरोडा टाकल्याची कबुली प्रकरणातील संबंधित आरोपींनी दिली आहे. दरम्यान, रविवारी आणखी एक आरोपी सिद्धापूर पोलिसांसमोर हजर झाला आहे. राकेश असे त्याचे नाव असून या प्रकरणातील तो सातवा आरोपी आहे. दरोड्याचा सूत्रधार झेवियरसह सर्वांनी चांगली जीवनशैली आणि जुगार खेळण्यासाठी कर्ज घेतले होते. ते फेडण्यासाठी त्यांनी एटीएम वाहनावर दरोडा टाकला होता.

Advertisement

मुख्य आरोपी गोपी आणि झेवियर महिन्याला 17,000 ऊपये कमवत होते. त्यापैकी झेवियरने एक वर्षापूर्वी नोकरी सोडली होती. दारू आणि जुगाराच्या व्यसनामुळे आरोपींना आर्थिक अडचणी येत होत्या. दरोड्याच्या पैशातून कर्ज फेडून उर्वरित पैशातून चांगले जीवन जगण्याची आरोपींनी योजना आखली होती. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल अन्नप्पा नाईक यांच्या योजनेनुसार वाहनावर दरोडा टाकल्याचे उघड झाले आहे. गोपी हा दरोडा प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणासंदर्भात, सुऊवातीला बेंगळुरात तिघांना अटक करण्यात आली होती. नंतर आणखी तिघांना हैदराबादमध्ये अटक करून त्यांना बेंगळुरात आणले आहे. या प्रकरणातील सातवा आरोपी राकेश यालाही पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी रवीचा भाऊ राकेश याने रवीसोबत दरोडा टाकण्याचा कट रचला होता. राकेशने स्वत: शनिवारी रात्री उशिरा सिद्धापूर पोलीस स्थानकात शरणागती पत्कारली आहे.

6.29 कोटी जप्त

7.11 कोटींच्या दरोड्याप्रकरणी आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून 6.29 कोटी जप्त केले आहेत. उर्वरित पैशांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या आणि काळजीपूर्वक तपास करत आरोपींनी वापरलेली वाहने जप्त केली आहेत, असे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर म्हणाले.

गृहमंत्र्यांकडून कौतुक

शहर पोलीस आयुक्त सीमंत कुमार सिंग, गुन्हे विभागाचे सहपोलीस आयुक्त अजय हिलोरी, पश्चिम विभागाचे सहपोलीस आयुक्त वंशी कृष्ण आणि दक्षिण विभागाचे डीसीपी लोकेश जगलासर यांनी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी रविवारी भेट दिली. दरोडा प्रकरणाचा छडा लावणाऱ्या शहर पोलिसांना आपल्या निवासस्थानी बोलावून त्यांच्या कामाबद्दल गृहमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article