मलवडी येथे ज्वेलर्सवर दरोडा
दहिवडी :
मलवडी (ता. माण) येथे बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी ज्वेलर्सवर दरोडा टाकत सोन्याचे व चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली.
मलवडी बसस्थानकासमोर असलेले नितीन गोपाळ गोरे (रा. बोराटवाडी) यांच्या श्रीराम ज्वेलर्सवर चोरट्यांनी दरोडा टाकत मध्यरात्री लोखंडी ग्रील व शटर उचकटून काढले व सीसीटीव्हीची वायर कापून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी दुकानातील सोन्याचे झुमके, टॉप्स, बदाम, साडेसात ग्रॅम वाजनाचे सोने व चांदीचे पैंजण, जोडवी, बीचव्या, कडली, वाळे व मोडीस घेतलेले 500 ग्रॅम वजनाचे असे एकूण 65.000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली. याबाबतची तक्रार श्रीराम ज्वेलर्सचे मालक नितीन गोरे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर सपोनि अक्षय सोनवणे यांनी तत्काळ घटनास्थळाची पाहणी करून तक्रार नोंद केली. त्यानंतर साताराहून श्वान पथक मागवून घेतले. श्वानाने घटनास्थळाच्या भोवतीच गिरट्या मारत तिथेच थांबल्याने तज्ञ अधिकारी यांनी तेथील काही जणांचे अंगठ्याचे ठसे घेतले.