For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सराफाच्या दुकानात दरोडा : दोघांना अटक

11:20 AM Feb 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
सराफाच्या दुकानात दरोडा   दोघांना अटक
Advertisement

वार्ताहर/विजापूर

Advertisement

हलसंगी गावात दुचाकीवरून येत बंदुकीचा धाक दाखवत सराफाच्या दुकानात दरोडा टाकण्यात आल्याची घटना 26 जानेवारी रोजी घडली होती. त्या प्रकरणातील दोन आंतरराज्य दरोडेखोरांना अटक करण्यात विजापूर पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून लाखो रुपयांच्या किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. हणमंत मल्लप्पा वाघोली (वय 28, मूळ संख गाव, सध्या रा. जत), शिवराज उर्फ गौडप्पा रावसाहेब नावी (वय 28, सध्या रा. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून  205 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1 किलो चांदी असे एकूण सुमारे 22 लाख रुपये किमतीचे दागिने, गुह्यात वापरलेली एक गावठी पिस्तूल तसेच आणखी 3 गावठी पिस्तूल, 26 जिवंत काडतुसे, एक एअरगन आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. हलसंगी गावातील या दरोड्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.

Advertisement
Advertisement
Tags :

.