पुण्यातील दरोडेखोरांना आंबोलीत पकडले
06:42 PM Aug 03, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
आंबोली / वार्ताहर
Advertisement
पुणे हिंजवडी येथे सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकून पळालेले चोरीतील तीन आरोपी आंबोली पोलीसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पकडले असून त्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ते गोवा येथून पुणे येथे चालले असल्याची माहिती आहे .त्यांच्याकडून दोन रिव्हॉल्व्हर आणि जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. आंबोली पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई, हवालदार सुमित पिळणकर,पोलिस दिपक शिंदे, पो . अभिजित कांबळे आणि उत्तम नार्वेकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना शिताफीने पकडले
Advertisement
Advertisement