For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रस्ताकाम पूर्ण; त्यानंतर पुन्हा खोदाई!

10:54 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
रस्ताकाम पूर्ण  त्यानंतर पुन्हा खोदाई
Advertisement

स्मार्ट सिटीतील कारभारामुळे संताप : रावसाहेब गोगटे सर्कल येथे खोदाई

Advertisement

बेळगाव : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील रस्ते, गटारींचे काम करण्यात आले. मात्र त्यानंतर 24 तास पाणीपुरवठ्यासाठी विविध ठिकाणी पाईप घालण्याचे काम सुरू आहे.  त्यामुळे नव्याने करण्यात आलेल्या रस्त्याची खोदाई केली जात आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. कॅम्प येथील सिग्नलपासून रावसाहेब गोगटे सर्कलपर्यंत खोदाई करून पाण्याची मोठी पाईपलाईन घालण्यात येत आहे. मात्र त्यामुळे नवीन केलेल्या रस्त्याचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरामध्ये विविध विकासकामे राबविण्यात आली. रस्ते, गटारी, सायकल ट्रॅक, बसथांबे, पदपथ बांधण्यात आले. मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याची पाईपलाईन घालण्यासाठी खोदाई करण्यात येत आहे. रस्ता करायचा, त्यानंतर पुन्हा त्याची खोदाई करायची, असे प्रकार वारंवार होत आहेत. कॅम्प येथील रहदारी सिग्नलपासून रावसाहेब गोगटे सर्कलपर्यंत सध्या खोदाईचे काम सुरू आहे. खोदाई करून त्याठिकाणी 24 तास पाणीपुरवठ्यासाठी एलअॅण्डटी कंपनी पाईप घालत आहे. मात्र चांगला असलेला रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खोदाई करत असल्यामुळे बेळगावच्या जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या ठिकाणी खोदाई सुरू असल्यामुळे वाहतुकीची कोंडीही होत आहे. जर रस्ता करण्यापूर्वीच खोदाई करून पाईप घातली असती तर नुकसान आणि श्रमही वाचले असते, अशा प्रतिक्रियाही उमटत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.