सावंतवाडी शहरातील रस्ते अपूर्णावस्थेत !
उंचसखल रस्त्यामुळे अपघाताची भीती ; प्रशासनाने द्यावे लक्ष
सावंतवाडी
गेली दोन-तीन वर्ष सावंतवाडी शहरात केलेले रस्ते हे अर्धवट अवस्थेत आहेत. रस्त्याच्या अर्ध्या भागाच्या डांबरीकरणाचे काम झाले असून अर्धा रस्ता अजूनही अपूर्णावस्थेत आहेत . या अर्धवट आणि उंचसखल स्थितीतील रस्त्यांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. तरी या अपूर्ण रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे . पंचम खेमराज महाविद्यालय तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासमोरील मार्ग असाच अर्धवट करण्यात आलेला आहे. तसेच शहरातील अनेक भागात असेच अर्धवट रस्ते करण्यात आले आहेत. हे सर्व मार्ग वर्दळीचे असून या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तरी याकडे नगरपालिका व बांधकाम विभागाने याकडे लक्ष घालून अपूर्ण रस्त्यांचे काम हाती घ्यावे अशी मागणी सावंतवाडीवासीय करीत आहेत .