डिफेन्स कॉलनीतील रस्ता कामाचा शुभारंभ
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून 50 लाखाचा निधी
वार्ताहर/हिंडलगा
येथील ग्राम पंचायत क्षेत्रातील डिफेन्स कॉलनीतील लक्ष्मी पार्क अपार्टमेंट ते आशा किरण प्लॅटिनियमपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. याची दखल बेळगाव ग्रामीणच्या आमदार व मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तातडीने घेऊन अनुसूचित फंडातून 50 लाखाचा निधी मंजूर केला. या रस्ता कामाचा शुभारंभ दि. 3 रोजी पार पडला. सदर रस्ता कामाचा शुभारंभ युवा काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, कुदळ मारून करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्षा मीनाक्षी हित्तलमणी उपस्थित होत्या. ग्राम पंचायत सदस्य प्रवीण पाटील यांनी प्रास्ताविक केले. डी. बी. पाटील यांनी स्वागत केले. मृणाल हेब्बाळकर यांनी विविध विकासकामांसाठी ग्राम पंचायत क्षेत्रात मंजूर केलेल्या निधीची माहिती दिली. कार्यक्रमाला ग्राम पंचायत सदस्य गजानन बांदेकर, राहुल उरणकर, प्रेरणा मिरजकर, रेणुका भातकांडे, अलका कित्तूर, सीमा देवकर तसेच दिलीप राणे, राजीव छाब्रिया, विश्वनाथ पाटील, रवी पाटील, हरिश्चंद्र पाटील उपस्थित होते. वीणा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले.