For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात ‘रस्ता सुरक्षा अभियान-2026'’कार्यशाळा आयोजित

04:33 PM Jan 07, 2026 IST | NEETA POTDAR
sangli   क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात ‘रस्ता सुरक्षा अभियान 2026 ’कार्यशाळा आयोजित
Advertisement

               महामार्ग पोलीसांनी अपघात टाळण्यासाठी नियम पाळण्याचे आवाहन

Advertisement

दिघंची : दिघंची येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात 'रस्ता सुरक्षा अभियान-२०२६' च्या अनुषंगाने महामार्ग पोलीस केंद्र कवठेमहांकाळ यांच्यातर्फे प्रबोधन करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाहतुक नियमांची माहिती देवुन मार्गदर्शन करण्यात आले.

महामार्ग पोलीस केंद्र कवठेमहांकाळचे पोलीस उपनिरीक्षक बाजीराव बाघमोडे, पोलीस हवालदार गोसावी, श्री. सुर्यवंशी, श्री. निर्मळे व सहकाऱ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले.शाळेतील विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना वाहतूक नियमाविषयी माहिती दिली. महामार्गावर हेल्मेट वापरण्याचे फायदे, सीट बेल्ट वापरण्याची गरज आणि त्याचे महत्व, अपघात न होण्यासाठी घ्यावयाची काळजी, अपघातग्रस्तांना मदतकरणे, त्या मदतीबद्दल पोलीसांकडून कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही देवुन उपनिरीक्षक बाजीराव बाघमोडे आणि सहकाऱ्यांनी प्रबोधन केले.

Advertisement

विद्यार्थी वर्गाने वाहतूक नियमाविषयी जागरूक रहावे, पालकांस व नातेवाईक नियमांची माहिती देवुन अपघात टाळण्यासाठी सामाजिक बांधिलकीतुन योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.अपघातांबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विविध निर्देशाबाबत सर्व माहिती देण्यात आली. वाहतुकीच्या नियमांचे पालन सर्वांनी केल्यास अपघातांना टाळणे शक्य आहे. प्रत्येकाने आपल्यापासुन वाहतुक नियमांच्या पालनासाठी सुरूवात करावी, असे आवाहनही उपनिरीक्षक बाजीराव वाघमोडे यांच्यासह महामार्ग पोलीस केंद्र कवठेमहांकाळच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केले.

Advertisement
Tags :

.