बैलहोंगल येथे रोड रोलरखाली सापडून सुपरवायझरचा दुर्दैवी मृत्यू
12:39 PM Sep 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : बैलहोंगल येथे राज्य महामार्गाच्या सुरू असलेल्या कामादरम्यान रोड रोलर अचानक मागे सरकल्याने त्याखाली सापडून सुपरवायझरचा जागीच मृत्यू झाला. पांडुरंग मधुसूदन (वय ५२, रा. बसवण बागेवाडी) असे मृत्यू झालेल्या सुपरवायझरचे नाव आहे.
Advertisement
पांडुरंग मधुसूदन हे अशोका कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. हिरेबागेवाडी ते सौंदत्ती दरम्यान राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. कामाची पाहणी करण्यासाठी पांडुरंग घटनास्थळी उपस्थित होते.
यावेळी उतारावर उभा असलेला रोड रोलर अचानक नियंत्रण सुटल्याने मागे सरकला. पांडुरंग यांना काही समजण्यापूर्वीच रोड रोलर त्यांच्या अंगावरून गेला. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Advertisement
घटनेची माहिती मिळताच बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी बैलहोंगल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
Advertisement