For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नंदगड वेशीतील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास

10:40 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
नंदगड वेशीतील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास
Advertisement

वार्ताहर /नंदगड

Advertisement

नंदगड-रायापूर ते बाजारपेठपर्यंतच्या रस्त्या दरम्यान तलावाच्या बांधाजवळील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक व नंदगडवासियांची गैरसोय होत आहे. दरवर्षी या ठिकाणी पावसाळ्यात खड्डे पडतात. खड्ड्यांतून पाणी साचते. या रस्त्यावरुन बेकवाड, कसबा नंदगड, खैरवाड, गर्बेनहट्टी व बिडी परिसरातील लोक नंदगड गावात येतात. शिवाय शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी बाजारपेठमार्गे ये-जा करतात. एखादे वाहन या खड्ड्यांतून गेल्यास घाण पाणी रस्त्यावरुन जाणाऱ्यांच्या अंगावर उडते. त्यामुळे कपडे घाण होतात. परिणामी वाहनधारक व पादचाऱ्यांत वादावादीचे प्रसंग उद्भवतात. जनतेच्या तक्रारीनंतर या खड्ड्यांतून मुरूम टाकण्यात येतो. त्यामुळे काही प्रमाणात घाण पाणी उडणे कमी होते. यावर्षी खड्डे पडले असून अद्याप या खड्ड्यांतून मुरूम टाकले नसल्याने वाहनधारक व ग्रामस्थांतून नाराजी पसरली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.