For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

थर्ड पार्टी ऑडीटरअभावी रस्ते तपासणी लांबणीवर

01:52 PM Jun 22, 2024 IST | Abhijeet Khandekar
थर्ड पार्टी ऑडीटरअभावी रस्ते तपासणी लांबणीवर
Advertisement

► प्रतिनिधी
कोल्हापूर
शहरातील शंभर कोटी रस्त्यांच्या दर्जाची तपासणी करून महापालिकेने अहवाल द्यावा, यासाठी आम आदमी पार्टीकडून पाठपुरावा करण्यात येत होता. यासाठी गुरुवारी संयुक्त तपासणी करायचे निश्चित केले होते. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याकडे विचारणा करता त्यांनी थर्ड पार्टी ऑडिटर, म्हणजेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे यांना निरोप देत आहोत. त्यांची वेळ मिळाल्यावर नियोजन करू या, असे सांगितले. यावर पदाधिकाऱ्यांनी ऑडिटरला पत्र पाठवून त्याची कॉपी द्यावी, असा आग्रह धरला. अखेर गुरुवारी महापालिका प्रशासनाने त्यांना मेलद्वारे कळवून वेळ मागितली. त्यामुळे गुरुवारी होणारी तपासणी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे पुढे ढकलली. यावर चार दिवसांत संयुक्त तपासणी न झाल्यास रस्त्याची कोअर काढून तपासणीसाठी देण्याचा इशारा आपने दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.