For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News | रहिमतपूरमध्ये निकृष्ट रस्त्यांविरोधात रस्ता रोको आंदोलन

01:08 PM Feb 27, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   रहिमतपूरमध्ये निकृष्ट रस्त्यांविरोधात रस्ता रोको आंदोलन
Advertisement

                         रहिमतपूर येथे रस्ता रोको आंदोलन

Advertisement

घुणकी- प्रदूषणमुक्त अशी ओळख असलेली वारणा नदी आता मळीमिश्रित व दुर्गंधीयुक्त पाणी मिसळल्याने प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वारणा काठच्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अनेकदा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलचर मृत होऊन नदीपात्रात तरंगताना आढळून आले आहे. या प्रश्नाकडे प्रदूषण महामंडळ, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असून नदीकाठच्या गावातील जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. चांदोली धरणापासून हरिपूर संगमापर्यंत वारणाकाठची शेकडो गावे नदीतील पिण्याच्या पाण्यावर तसेच शेती वापरासाठी अवलंबून आहेत. चांदोली धरणात साठा केले जाणारे पाणी बारणा नदीच्या पात्रातून विसर्ग केले जाते. त्यामुळे वारणा नदीपात्र बारमाही दुथडी भरून वाहत असते. मात्र वारणा नदीकाठावरील परिसरातील उद्योगांचे प्रक्रिया न केलेले सांडपाणी, काही गावातील गटारींचे घाण पाणी तसेच साखर कारखान्यांचे मळीमिश्रित पाणी ठिकठिकाणी थेट नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर मिसळत आहे. त्यामुळे या नदीच प्रदूषणाचा विळखा अधिक घट्ट होत चालल्याचे चित्र दिसत आहे.

Advertisement

या प्रदूषणाची तीव्रता वाढण्याआधीच त्यावर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. प्रदूषण या नदीचे पाणी प्रदूषित करणाऱ्या सर्व घटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातील गावातून होत आहे.याबाबत प्रदूषण मंडळ आणि लोकप्रतिनिधींनी गांभिर्याने लक्ष देऊन नदीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

आरोग्याचा प्रश्न गंभीर
प्रदूषित पाण्यामुळे बारणकाठाच्या अनेक गावांमध्ये साथीच्या रोग पसरत असल्याचे दिसत आहे. दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढत आहे. नदीपात्रात अनेकदा जलचर मृत अवस्थेत आढळत आहेत. त्यामुळे दुर्गंधीच्या त्रासालाही नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.