For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रॉच डरहॅमशी करारबद्ध

06:05 AM Feb 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
रॉच डरहॅमशी करारबद्ध
Advertisement

वृत्तसंस्था / लंडन

Advertisement

या वर्षीच्या इंग्लीश काऊंटी क्रिकेट स्पर्धेत खेळण्याचा निर्णय विंडीजचा वेगवान गोलंदाज केमर रॉचने घेतला असून त्याने नुकताच या काऊंटी स्पर्धेत खेळणाऱ्या डरहॅम क्लबशी करार केला आहे.

यापूर्वी रॉचने इंग्लीश काऊंटी क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या सरे संघाबरोबर 5 वर्षांचा करार केला होता. तो करार नुकताच संपुष्टात आल्याने आता रॉचने डरहॅम क्लबमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतील पाच हंगामात त्याने 30 सामन्यांतून 97 गडी बाद केले आहेत. तर कसोटी क्रिकेटमध्ये आता तो 300 बळींचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. 2009 साली रॉचने कसोटी पदार्पण केले होते. 88 कसोटीत त्याने आतापर्यंत 12 वेळा एका डावात 5 पेक्षा अधिक बळी घेतले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.