महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आर के स्वामी लिमिटेडचा येणार आयपीओ

06:29 AM Mar 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

आर के स्वामी लिमिटेड यांचा आयपीओ लवकरच बाजारात खुला होणार असून या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 423 कोटी रुपयांची उभारणी करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Advertisement

मार्केटिंग सेवा देणारी आर के स्वामी लिमिटेड यांचा आयपीओ शेअरबाजारामध्ये 4 मार्च रोजी खुला होणार असून 6 मार्चपर्यंत गुंतवणूकदारांना यामध्ये बोली लावता येणार आहे. कंपनीने आयपीओ अंतर्गत समभागाची किंमत 270-288 रुपये प्रति समभाग अशी निश्चित केली आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी आयपीओ एक मार्च रोजी बोली लावण्यासाठी खुला झाला आहे.

 कधी होणार सूचीबद्ध

समभाग शेअर बाजारामध्ये 12 मार्च रोजी सूचीबद्ध होणार आहे. आयपीओअंतर्गत 173 कोटी रुपयांचे ताजे समभाग जारी केले जाणार आहेत. प्रवर्तक आणि सध्याच्या गुंतवणूकदारांकडून 87 लाख इक्विटी समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत सादर केले जाणार आहेत. सदरची आर के स्वामी लिमिटेड ही मीडिया, डेटा अनालिटिक्सकरिता सेवा बजावत असून या क्षेत्रामध्ये 50 वर्षाचा अनुभव आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article