पृथ्वीच्या या हिस्स्यात वाहतात अॅसिडच्या नद्या
हवा आहे विषारी
पृथ्वीवर एक असे ठिकाण आहे, ज्याला पृथ्वीचे पाताललोक म्हटले जाऊ शकते, कारण हे पृथ्वीच्या खोल भागांपैकी एक आहे. तसेही याहून अधिक खोल भाग पृथ्वीवर आहेत, परंतु येथील धोकादायक वातावरणामुळे याला पाताललोकची संज्ञा दिली जाते. या भागात अॅसिडच्या नद्या वाहतात, ठिकठिकाणी उकळत्या पाण्याचे तलाव असून ज्यात अनेक प्रकारची नैसर्गिक रसायनं असतात आणि यातून विषारी धूर निघत असतो. येथील तापमान कधीच 45 अंशापेक्षा कमी नसते. पृथ्वीच्या सर्वात धोकादायक स्थानांपैकी एक असलेल्या या ठिकाणाचे नाव डानाकिल डिप्रेशन आहे. डानाकिल डिप्रेशन आफ्रिकेच्या इथियोपियात असून हे पृथ्वीवरील पाचव्या क्रमांकाचे खोल ठिकाण आहे. याला ‘नर्काचे प्रवेशद्वार’, ‘पाताललोक’ देखील म्हटले जाते. हे पृथ्वीवरील सर्वात अजब ठिकाणांपैकी एक आहे. येथील सक्रीय ज्वालामुखी आणि याच्या आसपास फैलावलेले सल्फ्यूरिक अॅसिडचे तलाव सातत्याने विषारी वायू, तप्त द्रवपदार्थ आणि विषारी वायूचे उत्सर्जन करतात. यामुळे पूर्ण वातावरण विषारी ठरते. तसेच येथे मोठमोठे अॅसिडचे तलाव, झरे आणि नद्या असून हवेत सल्फर आणि क्लोरिन यासारखे विषारी वायू मिसळलेले आहेत.
समुद्रसपाटीपेक्षा 125 मीटर खाली
हॉर्न ऑफ आफ्रिकेच्या मध्यात असलेले डानाकिल डिप्रेशन जगातील सर्वात दुर्गम आणि कमी अध्ययन झालेले स्थान आहे. हे उत्तर-पश्चिम इथियोपियात एक सक्रीय ज्वालामुखींचा भाग असून जे समुद्रसपाटीपासून 125 मीटर खाली असून ते इरिट्रियाच्या सीमेनजीक आहे.
पाऊस कधीतरीच..
येथील धोकादायक वातावरण आणि अजब स्थितीमुळे हे ठिकाण परग्रह किंवा साय-फाय चित्रपटाच्या दृश्याप्रमाणे दिसते. येथील तापमान नियमित स्वरुपात 45 अंशापर्यंत पोहोचते. येथे फारच कमीवेळा पाऊस पडतो. तर ज्वालामुखी आणि क्षेत्रातील वितळलेले मॅग्मा समुद्र क्रस्टच्या पृष्ठभागाखालून वाहत असतात.
सातत्याने निघतो लाव्हारस
येथे दोन अत्याधिक सक्रीय ज्वालामुखी असून यातील एक एर्टा एलेच्या शिखरावर एक सक्रीय लाव्हारसाने निर्मित सरोवर आहे. हे क्षेत्र अॅसिडचे तलाव आणि तप्त पाण्याने भरलेले आहे आणि यात डालोल नावाचा एक खोल ख•ा आहे. नैसर्गिक रसायने, मीठ आणि अॅसिडमुळे येथे मोठमोठ्या ख•dयांमध्ये रंगबिरंगी पाणी भरलेले असते. हे रंगीत पाणी सागरी जलात असलेले मीठ आणि मॅग्मामधील खनिजाचे कारण ठरते.
तलावांमधून बाहेर पडतो विषारी धूर
येथील उकळत्या तलावांमधून रंगीत धूर निघत असतो. हा धूर विषारी असतो. येथील माती देखील मीठात रुपांततिरत झाली आहे. येथे चहुबाजूला पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे चमकदार तलाव आहेत. यात उकळते पाणी वर येते, तर विषारी क्लोरिन आणि सल्फर वायू हवेत मिसळत असल्याने जीवघेणी स्थिती निर्माण होते.
रंगबिरंगी तलाव
सर्वात तप्त आणि सर्वात आम्लीय तलावांमध्ये सल्फर आणि मीठ प्रतिक्रिया करून चमकणाऱ्या पिवळ्या रंगाचे आवरण तयार करतात. तर थंड तलावांमध्ये तांब्यामुळे वेगळा रंग निर्माण होतो. यामुळे तलावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग दिसून येतात. डानाकिल एक परग्रहासारखे दिसते आणि काही प्रमाणात अमेरिकत येलोस्टोन सारख्या सक्रीय हायड्रोथर्मल क्षेत्रांसमान आहे. परंतु हे अत्यंत तप्त आहे आणि याचे पाणी अत्यंत आम्लयुक्त आहे.