बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार रित्विक भौमिक
छोटा पडदा आणि डिजिटल जगतात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता रित्विक भौमिक आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. ‘बंदिश बँडिट्स’द्वारे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणार रित्विक लवकरच ‘अभूतपूर्व’ या हिंदी चित्रपटात दिसून येणार आहे. हा चित्रपट रोमँटिक हॉरर कॉमेडी धाटणीचा असेल, ज्याची कहाणी 90 च्या दशकातील आगरा शहरावर बेतलेली असणार आहे. रित्विक भौमिकने अमेझॉन प्राइमच्या म्युझिकल वेबसीरिज ‘बंदिश बँडिट्स’मध्ये काम केले होते. यानंतर त्याने मजा मा, खाकी: द बंगाल चॅप्टर यासारख्या सीरिजमध्ये त्याने भूमिका साकारली होती. आता तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत स्वत:च्या कारकीर्दीला नवे वळण देणार आहे. अभूतपूर्व चित्रपटात तो अभय नावाच्या युवकाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील रित्विकचा फर्स्ट लुक शेअर करण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती ख्याति मदान यांच्या नॉट आउट एंटरटेन्मेंटकडून केली जाणार आहे. चित्रपटातील उर्वरित कलाकारांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.