ऋत्वी कंग्राळकरला रौप्यपदक
10:59 AM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : मंगळूर येथे वन अॅक्वेटिक क्लब यांच्या वतीने आयोजित जलतरण स्पर्धेत 50 मी. बॅकस्ट्रोक प्रकारात पॅशनेट स्पोर्ट्स अकादमीच्या ऋत्वी कंग्राळकरने रौप्यपदक पटकावले. ऋत्वी गेल्या एका वर्षापासून नियमित सराव करत असून ती पीएसएमधील एक होतकरू व गुणवंत जलतरणपटू म्हणून पुढे येत आहे. तिची ही कामगिरी म्हणजे तिची मेहनत, शिस्त आणि प्रशिक्षकांनी दिलेल्या तांत्रिक मार्गदर्शनाचा परिणाम आहे. ऋत्वीचे हे रौप्य पदक त्या प्रवासातील एक महत्त्वाचे पाऊल असून पुढे अनेक यशस्वी टप्पे तिची वाट पाहत आहेत.
Advertisement
Advertisement