For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Municipal Corporation Election 2026 : हाय व्होल्टेज लढतीत ऋतुराज क्षीरसागरांचा दणदणीत विजय

03:42 PM Jan 16, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur municipal corporation election 2026   हाय व्होल्टेज लढतीत ऋतुराज क्षीरसागरांचा दणदणीत विजय
Advertisement

                                  अमेरिकेतून प्रचार, पण विजय क्षीरसागरांचाच

Advertisement

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये काही हाय व्होल्टेज लढतींकडे सर्वांचे लक्ष होते.त्यात प्रभाग क्रमांक ७ ड कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहीले होते.

या प्रभागातून कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे सुपूत्र ऋतुराज क्षीरसागर हे महापालिकेसाठी रिंगणात शिवसेना ( शिंदे गटाकडून )  होते. त्याच्या विरोधात माजी नगरसेवक विजय साळोखे सरदार हे अपक्ष म्हणून रिंगणात होते.माजी नगरसेवक विजय साळोखे सरदार यांनी सोशल मि़डीयावर अनेक वेळा कोल्हापूरच्या समस्या मांडून कोल्हापूरकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामूळे या प्रभागात काय होतंय याकडे कोल्हापूरकरांसह राज्याचे लक्ष होते.

Advertisement

या हाय व्होल्टेज लढतींमध्ये ऋतुराज क्षीरसागर यांनी विजय खेचून आणत विजय साळोखे  यांचा मोठ्या संख्येने  पराभव केलेला आहे.

कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक ७ ड मधील निवडणुकीची सोशल मीडियावर चांगलीच हवा झाली होती. त्यामुळे अख्या कोल्हापुरात या लढतीकडे सर्वांचे लक्ष होते. अपक्ष अन् सोशल मीडियावर चांगले अॅक्टिव्ह असलेले सरदार साळोखे यांच्या समर्थनातून थेट अमेरिकेतून व्हिडिओ करण्यात आले होते. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होती. मात्र शेवटी सोशल मीडियावरील हवा ही हवाच राहिली अन् आमदारपुत्र ऋतुराज क्षीरसागर यांना विजयी गुलाल लागला.

Advertisement
Tags :

.