For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजीव गांधी कला मंदिरच्या अध्यक्षपदी रितेश नाईक

10:23 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
राजीव गांधी कला मंदिरच्या अध्यक्षपदी रितेश नाईक
Advertisement

तब्बल चार वर्षांनंतर संचालक मंडळाची निवड

Advertisement

फोंडा : तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर फोंडा तालुक्याचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या राजीव गांधी कला मंदिरवर संचालक मंडळ निवडण्यात आले आहे. फोंडा पालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रितेश रवी नाईक यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून अध्यक्षांसह अकरा संचालक मंडळाची कार्यकारी समितीही जाहीर करण्यात आली आहे. तसा आदेश कला व संस्कृती खात्याचे संचालक विवेक नाईक यांनी सोमवारी जारी केला आहे.

कला मंदिरच्या संचालक मंडळावर बोरीचे माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक नाईक बोरकर, नगरसेवक शौनक बोरकर, कुर्टीचे माजी सरपंच व विद्यमान पंचसदस्य अभिजित गावडे तसेच महेश शिलकर, सूर्यकांत नाईक, रघुनाथ साकोर्डेकर, नितीन कोलवेकर, सुनिल खेडेकर, अशोक एस. नाईक व आगोस्तिनो फर्नांडिस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र उपाध्यक्षपद अजून जाहीर करण्यात आलेले नाही. रितेश नाईक यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Advertisement

राजीव गांधी कला मंदिरवर तब्बल चार वर्षानंतर हे संचालक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. विधानसभेच्या 2022 साली झालेल्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. त्यावेळी उपाध्यक्ष म्हणून फोंड्याचे माजी नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर यांच्याकडे ताबा होता. त्यानंतर गेल्या चार वर्षांनंतर कला मंदिरवर पुन्हा संचालक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.