For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्लास्टिकमुळे गंभीर आजार होण्याचा धोका

06:51 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्लास्टिकमुळे गंभीर आजार होण्याचा धोका
Advertisement

प्लास्टिकच्या कणांमुळे फुफ्फुसं खराब होण्याची शक्यता

Advertisement

प्लास्टिकचे कण आता श्वसनासोबत मानवी शरीरात पोहोचत असतात. तसेच ते पाण्यातून, अन्नातूनही शरीरात दाखल होतात. शेकडो वर्षांपासून प्लास्टिक वातावरणात जमा होते, त्याचे प्रमाण प्रचंड वाढल्याने आता मानवी आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी 2000 ट्रक कचऱ्याइतके प्लास्टिक फेकले जात आहे, हा कचरा समुद्र, नद्या आणि तलावांमध्ये साचतोय. हा कचरा 2 ते 25 दशलक्ष टन प्लास्टिकइतका आहे. यावर प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस नटावाच्या संस्थेने एक अहवाल सादर केला आहे.  एक लिटर पाण्यात प्लास्टिकचे सुमारे 2 लाख 40 हजार अत्यंत सुक्ष्म कण असतात असे या अहवालात म्हटले गेले आहे.

मानव जगभरात 400 दशलक्ष मेट्रिक टन प्लास्टिक दरवर्षी तयार करत आहे. यातील 3 कोटी टनाहून अधिक प्लास्टिक पाण्यात किंवा जमिनीवर फेकण्यात येत ओह. प्लास्टिक नष्ट होत असल्याने ते हवेद्वारे श्वसनाच्या माध्यमातून मानवी शरीरात पोहोचत आहे, मातीत मिसळत आहे, पिकं झांड आणि शेवटी अन्नात प्रवेश करत हा आपणच तयार केलेला राक्षस वळसा घालून आपल्याला नष्ट करतोय असे तज्ञांनी म्हटले आहे.

Advertisement

श्वासातून शरीरात पोहोचणारे प्लास्टिक फुफ्फुसांना प्रचंड हानी पोहोचवत असल्याचे अनेक संकेत मिळाले आहेत. हे प्लास्टिक दीर्घकाळ शरीरात साचत राहिल्यास काय होईल यावर आता शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. पर्यावरणात असलेले हे प्लास्टिक मानवी आरोग्यावर काय परिणाम करत आहे याकडे काही अध्ययनांनी लक्ष वेधले आहे. फुफ्फसाचा कॅन्सर झालेल्या रुग्णांच्या नमुन्यांमध्ये प्लास्टिकचे छोटे कण आढळून आले आहेत. प्लास्टिक किंवा फायबर उत्पादनात काम करणाऱ्या लोकांची फुफ्फुसे झपाट्याने खराब होत आहेत. प्लास्टिकचा अतिरेक झाल्यामुळे फुफ्फुसांवर सूज येत आहे.

प्लास्टिकमुळे या आजारांचा धोका

ल्युकेमिया

लिंफोमा

मेंदूचा कॅन्सर

स्तनाचा कॅन्सर

प्रजननक्षमता कमी होणे

Advertisement
Tags :

.