For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पावसाळ्यापूर्वी श्वसन संसर्गाचा धोका वाढला

12:31 PM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
पावसाळ्यापूर्वी श्वसन संसर्गाचा धोका वाढला
Advertisement

डॉक्टरांकडून न्यूमोकोकल लसीकरणाचे आवाहन : व्याधी, रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांनी घेणे गरजेचे

Advertisement

बेळगाव : मान्सूनपूर्व पावसाला सुऊवात होताच श्वसनविकारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने वैद्यकीय तज्ञांनी उच्च जोखमीच्या गटातील नागरिकांना न्यूमोकोकल लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त व्यक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या ऊग्णांना पावसाळ्यात न्यूमोनिया आणि इतर गंभीर श्वसन संसर्गाचा धोका अधिक असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

न्यूमोनिया व बॅक्टेरियल मेनिंजायटीससारख्या जीवघेण्या संसर्गापासून संरक्षण मिळविण्यासाठी न्यूमोकोकल लस प्रभावी ठरते. मात्र भारतात प्रौढांच्या लसीकरणाकडे अजूनही अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नाही. भारतात बालकांच्या लसीकरण कार्यक्रमांना मोठे महत्त्व दिले जाते. मात्र प्रौढांच्या लसीकरणाबाबत जागरुकता आणि धोरणात्मक लक्ष कमी असल्याने आरोग्य व्यवस्थेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे.

Advertisement

पावसाळ्याच्या काळात न्यूमोनिया आणि गंभीर श्वसन संसर्गाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने ऊग्णालयातील आपत्कालीन विभाग आणि अतिदक्षता विभागांवर मोठा ताण निर्माण होतो. अनेक ऊग्णांना उपचारासाठी दाखल करावे लागत असल्याने आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त भार पडतो. भारतात दरवषी न्यूमोकोकल न्यूमोनियाची सुमारे 40 ते 50 लाख प्रकरणे नोंदविली जातात. या आजाराने बाधित झालेल्या सुमारे 70 टक्के ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात येते. त्यामुळे वृद्धांचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे ठरते.

रुग्णाचे वय आणि आरोग्यस्थिती लक्षात घेता न्यूमोकोकल लसीकरणामुळे गंभीर आणि जीवघेण्या न्यूमोकोकल न्यूमोनियाचा धोका सुमारे 50 ते 65 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. यापूर्वी भारतात पीसीव्ही-13 व पीपीएसव्ही-23 या दोन प्रकारच्या न्यूमोकोकल लसी उपलब्ध होत्या. अलीकडेच पीसीव्ही-20 ही नवीन लस उपलब्ध झाली असून ती अधिक प्रकारच्या जीवाणूंविऊद्ध संरक्षण देते. तसेच ही लस एकाच डोसमध्ये दिली जात असल्याने अधिक प्रभावी पर्याय मानली जात आहे.

लसीकरण हे प्रभावी संरक्षणाचे साधन

केवळ ज्येष्ठ नागरिकांनीच नव्हे तर विशिष्ट वैद्यकीय समस्या असलेल्या तरुणानींही लसीकरणाचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. मधुमेह, हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार, कर्करोग किंवा इतर दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींना तसेच धूम्रपान करणाऱ्यांना फुफ्फुसांच्या संसर्गाचा धोका अधिक असतो. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व सहव्याधींनी ग्रस्त तरुणांनाही गंभीर गुंतागुंतीचा सामना करावा लागू शकतो. अशा व्यक्तींसाठी लसीकरण हे प्रभावी संरक्षणाचे साधन आहे.

काही ऊग्णांमध्ये फुफ्फुसांपर्यंत संसर्ग

दरवषी हिवाळ्यात श्वसनविकारांचे प्रमाण वाढते. त्यानंतर उन्हाळ्यात ते कमी होते आणि पावसाळ्यात पुन्हा वाढते. मात्र यंदा हा नेहमीचा पॅटर्न दिसून आलेला नाही. साधारणपणे उन्हाळ्यात श्वसन संसर्ग कमी होतात. मात्र यंदा उन्हाळ्याच्या काळातही मोठ्या प्रमाणात वरच्या श्वसनमार्गाच्या संसर्गाची प्रकरणे आढळली. त्यापैकी काही ऊग्णांमध्ये फुफ्फुसांपर्यंत संसर्ग पोहोचला आणि त्यांना ऊग्णालयात दाखल करावे लागले.

लसीकरणाबाबत जागरुकता आवश्यकता

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी ज्येष्ठ नागरिक, दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्ण आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय सल्ल्यानुसार न्यूमोकोकल लसीकरण करून घ्यावे. यामुळे गंभीर संसर्गाचा धोका कमी होऊन रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही घटू शकते. लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

Advertisement
Tags :

.