महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मोबाइलमुळे ‘डिजिटल डिमेंशिया’ची जोखीम

06:41 AM Sep 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्मरणशक्ती, एकाग्रता अन् शिकण्याची क्षमता घटतेय

Advertisement

मागील एक दशकात दैनंदिन जीवनात मोबाइलचा वापर अत्यंत वेगाने वाढला आहे. यामुळे आमच्या मानसिक आरोग्यावर पडणाऱ्या दुष्परिणामांपैकी एक ‘डिजिटल डिमेंशिया’मध्ये वेगाने वाढ होत आहे. अत्याधिक स्क्रीन टाइम म्हणजेच स्मार्टफोनच्या वापरामुळे मेंदूमध्ये होणाऱ्या नकारात्मक परिवर्तनांचे प्रमाण वाढले आहे. फोनवर सातत्याने अनेक प्रकारची सामग्री स्क्रॉल करणे, वाचणे, पाहणे आणि या सर्व माहितीला समजून घेण्याच्या प्रयत्नामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि शिकण्याची क्षमता कमी होणे यात सामील आहे.

Advertisement

डिजिटल डिमेंशिया हा शब्द जर्मन न्यूरोसायंटिस्ट आणि मनोचिकित्सक मॅनफ्रेड  स्पिट्जर यांच्याकडून 2012 मध्ये तयार करण्यात आला होता. डिजिटल डिमेंशियावर अधिकृतपणे सध्या कुठलेही निदान किंवा उपचार नाहीत.

वॅस्कुलर डिमेंशिया

ब्रिटनमध्ये 2023 साली करण्यात आलेल्या अध्ययनानुसार दिवसात 4 तासांपेक्षा अधिक स्क्रीनटाइममुळे वॅस्कुलर डिमेंशिया आणि अल्झायमरची जोखीम वाढू शकते.  वॅस्कुलर डिमेंशिया मेंदूत रक्तप्रवाहाच्या कमतरतेमुळे होतो. हा मेंदूंच्या पेशींना नुकसान पोहोचवितो आणि अखेरीस त्यांना नष्ट करत असतो.

मर्यादित वापराचा विचार करा

नोटिफिकेशन कमी करा : फोनच्या सातत्याच्या वापरापासून वाचण्याची एक पद्धत नोटिफिकेशनची संख्या कमी करणे आहे. एखादी नोटिफिकेशन आवश्यक नसेल तर ती पूर्ण बंद करण्याचा विचार करा.

लक्ष केंद्रीत करण्यावर भर : वेळ घालविण्यासाठी फोन सर्वात सहजपणे वापरले जाणारे उपकरण आहे. फोनऐवजी पुस्तक वाचणे, व्यायाम आणि फिरणे इत्यादींचा प्रयत्न करा.

कालमर्यादा निश्चित करा : स्क्रीन टाइम करण्याचा उद्देश फोनपासून मुक्तता मिळविणे नाही. दररोज स्क्रॉल करणे, व्हिडिओ पाहणे, गेम खेळण्यासाठी काही काळ काढण्यावर विचार करा.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article