शहरातील वाढते तापमान कायम : शरीराची लाहीलाही
बेळगाव : शहरातील उष्म्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे वाढते तापमान कायम आहे. त्यामुळे दिवसा शरीराची लाहीलाही होऊ लागली आहे. विशेषत: वाढत्या उष्म्याने जनता हैराण झाली आहे. त्यामुळे सकाळ व सायंकाळीच बाहेर पडण्यास पसंदी दिली जात आहे. मागील काही दिवसांपासून शहराचा पारा 35 अंशांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे जनजीवनावर याचा परिणाम होऊ लागला आहे. वाढत्या तापमान वाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. शिवाय बदलत्या हवामानाचा अनुभव येऊ लागला आहे. मागील आठवड्यात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला होता. त्यानंतर ढगाळ वातावरण अनुभवयास मिळाले होते. मात्र उन्हाचा पारा कायम आहे. एप्रिल महिन्याच्या प्रारंभी शहर परिसरात वळिवाच्या पावसाने हजेरी लावली हाती. त्यानंतर पावसाने हुलकावणीच दिली आहे. वाढत्या उन्हामुळे दाहकता वाढलेल्या नागरिकांना वळिवाची प्रतीक्षा लागली आहे. शहर परिसराला मागील काही दिवसापासून वळीव पावसाने हुलकावणी दिली आहे. ग्रामीण भागातील काही गावांमध्ये वळीव बरसला असला तरी शहर परिसरात वळिवाने पाठ फिरविली आहे. वाढत्या उष्म्यामुळे गारवा निर्माण होण्यासाठी वळिवाची प्रतीक्षा लागली आहे.