For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाढत्या तापमानामुळे घटतेय झोप

06:42 AM Jan 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
वाढत्या तापमानामुळे घटतेय झोप
Advertisement

हवामान बदलाचा प्रभाव : आरोग्याला मोठा धोका

Advertisement

दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या एका विस्तृत आंतरराष्ट्रीय अध्ययनाने वाढते तापमान जगभरातील झोपेवर मोठा प्रभाव पाडत असल्याचा इशारा दिला आहे. झोपेचा कालावधी छोटा होत असून गुणवत्ता कमी होतेय आणि याचा सर्वात तीव्र प्रभाव गरीब, आजारी आणि प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या लोकसंख्येवर पडत आहे. भविष्यात प्रत्येक माणूस वर्षभरात केवळ उष्ण रात्रींमुळे 24 तासांपर्यंतची झोप गमावू शकतो, जे सार्वजनिक आरोग्यासाठी  गंभीर धोका आहे.

दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि हार्वर्ड मेडिकल स्कूल ब्रिघम अँड वुमेन्स हॉस्पिटलच्या सहकार्याने करण्यात आलेल्या या अध्ययनात 14,232 अमेरिकन्सच्या 1.2 कोटी रात्रींच्या झोपेचा डाटा सामील करण्यात आला. संशोधकांनी फिटबिटद्वारे रिकॉर्ड करण्यात आलेला झोपेचा टप्पा, झोपमोड होण्याचे प्रमाण, झोप येण्यास लागणारा कालावधी आणि हवामानसंबंधी आकडेवारीचे विस्तृत विश्लेषण केले. याच्या निष्कर्षांमधून रात्रीच्या तापमानात झालेली वाढ सरासरी 2.63 मिनिटांची झोप घटविते. याचे प्रमाण कमी दिसत असले तरीही कोट्यावधी लोक समग्र स्वरुपात जेव्हा स्वत:ची झोप गमावतात, तेव्हा ही स्थिती थेट सार्वजनिक आरोग्य संकटाचे रुप धारण करते. खास बाब म्हणजे अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर राहणारे लोक उर्वरित क्षेत्रांच्या तुलनेत जवळपास 3 पट अधिक झोप गमावत आहेत. जून ते सप्टेंबरच्या महिन्यांमध्ये झोपेची कमाल घसरण झाली आहे.

Advertisement

कोण सर्वाधिक प्रभावित

वाढत्या तापमानाचा सर्वाधिक प्रभाव महिला, गरीब आणि जुन्या आजारांना तोंड देणाऱ्या लोकसंख्येवर पडल्याचे विश्लेषणातून समोर आले. अशाप्रकारचे लोक पूर्वीच आरोग्य आणि आर्थिक आव्हानांना तेंड देत असतात आणि तप्त रात्रींमुळे झोपेचे प्रमाण कमी झाल्याने त्यांच्यासाठी नव्या आरोग्य जटिलता निर्माण होत आहेत. तज्ञांनुसार रात्रीचे वाढते तापमान शरीराला स्वाभाविक स्वरुपात थंड होऊ देत नाही.

भारतात वाढत आहेत अस्वस्थ रात्री

क्लायमेट सेंट्रल आणि क्लायमेट ट्रेंडसचा इशारा, आंतरराष्ट्रीय संघटनांच्या संयुक्त विश्लेषणातून भारतात तप्त रात्रींमध्ये वेगाने वाढ हवामान बदलाशी थेट जोडलेली आहे.  स्लीपलेस नाइट्स अहवालानुसार 2018-23 दरम्यान केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि आंध्रप्रदेशच्या शहरांमध्ये 50-80 अतिरिक्त रात्रींमध्ये तापमान 25 अंशापेक्षा अधिक राहिले होते.

Advertisement
Tags :

.