महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कच्च्या तेलाच्या किमतीवर वाढता दबाव

06:12 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

इराकवर इराणने हल्ला केल्यानंतर जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीवर दबाव दिसून येतो आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती म्हणजेच ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती शंभर रुपये डॉलर प्रति बॅरलवर पोहोचतील असा तज्ञांनी अंदाज वर्तवला आहे.

Advertisement

इराण आणि इराकमधील वाढत्या भू राजकीय परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या बाबतीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येणाऱ्या आठवड्यामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढीची शंका व्यक्त केली जात आहे. भारतातील रिलायन्स उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये कच्च्या तेलाची आयात करत असते. यांना याचा फटका बसणार आहे. जागतिक स्तरावर पाहता इराण या देशाकडून मोठ्या प्रमाणामध्ये कच्च्या तेलाचा पुरवठा होतो.

या नव्याने निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आगामी काळात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होणार

असल्याचेही बोलले जात आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article