रेपोदर कपातीच्या अपेक्षेने तेजी
तीन दिवसांच्या घसरणीला ब्रेक : सेन्सेक्स 261 अंकांनी वधारला
मुंबई : भारतीय भांडवली बाजारातील तीन दिवसांच्या घसरणीला ब्रेक मिळाला आहे, यामध्ये रेपो दरात कपातीची अपेक्षा वाढल्याने ही तेजी राहिली आहे. दरम्यान जागतिक बाजारांकडून सकारात्मक संकेत मिळाल्याने बुधवारी भारतीय शेअर बाजार तेजीत राहिला. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 50 अंकांपेक्षा जास्त वाढून 80,777 अंकांवर उघडला. अमेरिका-चीन व्यापार चर्चेत प्रगतीची अपेक्षा आणि या आठवड्याच्या अखेरीस भारतीय रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीची अपेक्षा यामुळे बुधवारी बाजार वधारला. धातू आणि आयटी क्षेत्रातील समभागांना खरेदीदारांकडून प्रोत्साहन मिळाले.
दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 260.74 अंकांच्या तेजीसोबत 0.32 टक्क्यांच्या मजबूत कामगिरीसह निर्देशांक 80,998.25 वर बंद झाला. याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजारचा निफ्टी अखेर तो 77.70 अंकांच्या वाढीसह 24,620.20 वर बंद झाला. व्यापक बाजारात, निफ्टी मिडकॅप निर्देशांक आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.51 टक्के आणि 0.82 टक्क्यांनी वाढले. क्षेत्रीय आघाडीवर, निफ्टी मेटल निर्देशांक सर्वाधिक 0.8 टक्केने वाढला. याशिवाय, निफ्टी आयटी निर्देशांक 0.62 टक्के आणि ऑटो निर्देशांक 0.5 टक्क्यांनी वधाले आहेत.
भारती एअरटेल, इटरनल, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा आणि बजाज फिनसर्व्ह हे आज सेन्सेक्समध्ये सर्वाधिक नफा मिळवणारे होते. यामध्ये 2.9 टक्के वाढ झाली. दुसरीकडे, टीसीएस, टायटन, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, अदानी पोर्ट्स, सन फार्मा आणि अॅक्सिस बँक हे घसरणीचे प्रमुख घटक होते. 1.5 टक्क्यांपर्यंत घसरण झाली
आरबीआय बैठक सुरू
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) च्या चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) बुधवार 4 जूनपासून सुरू होईल. धोरणात्मक निर्णय शुक्रवारी 6 जून रोजी जाहीर केला जाईल. एका सर्वेक्षणानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समिती रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात करून 5.75 टक्के करेल अशी अपेक्षा आहे. या सर्वेक्षणात नऊ प्रतिसादकर्त्यांनी हे भाकीत केले आहे. तथापि, स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिक आक्रमक अंदाज व्यक्त केला आहे, ज्यामध्ये 50 बेसिस पॉइंट्सची कपात अपेक्षित आहे.
जागतिक बाजारपेठेतून कोणते संकेत मिळतात?
बुधवारी आशियाई बाजारपेठेत वाढ नोंदवली गेली. वॉल स्ट्रीटमधील वाढीमुळे आशियाई बाजारपेठेतही बळकटी आली. टेक स्टॉक्समध्ये आणि विशेषत: एनवीडीया सारख्या चिप उत्पादक कंपन्यांमध्ये तेजीमुळे हे बळकटी आले.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- इटरनल 245
- भारती एअरटेल 1847
- इंडसइंड बँक 814
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1423
- टाटा मोटर्स 709
- टेक महिंद्रा 1562
- एचडीएफसी बँक 1940
- इन्फोसिस 1548
- टाटा स्टील 158
- हिंदुस्थान युनि 2363
- नेस्ले 2392
- एनटीपीसी 329
- मारुती सुझुकी 12175
- अदानी पोर्ट 1436
- महिंद्रा-महिंद्रा 3051
- पॉवरग्रिड कॉर्प 288
- बजाज फायनान्स 8985
- कोटक महिंद्रा 2046
- कॅनरा बँक 117
- कमिन्स 3340
- मॅक्स हेल्थकेअर 1144
- अपोलो हॉस्पिटल 6857
- टीव्हीएस मोटार 2760
- वेदान्ता 436
- बीपीसीएल 311
- कोल इंडिया 394
समभाग घसरलेल्या कंपन्या
- बजाज फिनसर्व्ह 1958
- अॅक्सिस बँक 1171
- टीसीएस 3380
- टायटन 3499
- आयसीआयसीआय 1431
- स्टेट बँक 806
- एशियन पेन्ट्स 2249
- एचसीएल टेक 1622
- सनफार्मा 1666
- अल्ट्राटेक सिमेंट 11030
- आयटीसी 416
- सुझलॉन एनर्जी 66
- आयशर मोटर्स 5302
- लार्सन-टुब्रो 3624
- ल्यूपिन 1943
- जेएसडब्लू स्टील 968