महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रिषभ पंत आयपीएलमधून पुनरागमन करणार

06:29 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीचा यष्टीरक्षक आणि आक्रमक फलंदाज रिषभ पंतचे वाहन अपघातानंतर क्रिकेटमध्ये लवकरच पुनरागमन होत आहे. अलूरमध्ये सरावाच्या सामन्यात तो तब्बल दोन वर्षानंतर क्रिकेट मैदानात खेळताना दिसला. 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या 17 व्या आयपीएल स्पर्धेत पुनरागमनाचे संकेत पंतकडून मिळत आहेत. सदर माहिती एका क्रिकेट वाहिनीकडून देण्यात आली आहे.

Advertisement

आगामी आयपीएल स्पर्धेत पंत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करेल, असेही समजते. बेंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पंत क्रिकेटचा सराव बऱ्यापैकी करत असल्याचे समजते. 26 वर्षीय रिषभ पंतवर लंडनमध्ये वैद्यकिय इलाज करण्यात आले होते. मोटार अपघातामध्ये त्याच्या पायाला जबरदस्त दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला जवळपास 15 महिने क्रिकेटपासून अलिप्त रहावे लागले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article