For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिषभ पंतने लखनौचे कर्णधारपद सोडले

06:53 AM May 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
रिषभ पंतने लखनौचे कर्णधारपद सोडले
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील लखनौ सुपर जायंट्सच्या संघाची कामगिरी अत्यंत निकृष्ट झाल्याने या संघाचा कर्णधार रिषभ पंतने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रिषभ पंतने या स्पर्धेत 14 डावांत 312 धावा जमविल्या होत्या.

लखनौ संघाच्या खराब कामगिरीमुळे पंत आपले कर्णधारपद गमविणार याचे संकेत 14 मे रोजी या संघाचे क्रिकेट संचालक टॉम मुडीने दिले होते. त्यानंतर रिषभने लखनौच्या फ्रांचायझींकडे आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.

Advertisement

Advertisement
Tags :

.