For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिषभ पंतकडे दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व

06:58 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
रिषभ पंतकडे दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पुनरागमन करणाऱ्या रिषभ पंतची दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जीवघेण्या अपघातातून आश्चर्यकारकरित्या वाचलेल्या पंतची ही दुसरी इनिंग ठरणार आहे.

यष्टिरक्षक-फलंदाज असलेला पंत अपघातानंतर 14 महिने क्रिकेटपासून दूर  होता. डिसेंबर 2022 मध्ये त्याच्या कारला अपघात झाला होता. ‘कर्णधार म्हणून पंतचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. जिगरबाज आणि निर्भयपणा हा त्याच्या खेळाचा ब्रँड बनलेला आहे. याच गुणाच्या बळावर तो घातक अपघातातून बचावला आणि त्यातून लवकर बरादेखील झाला आहे. तो आमच्या संघाचे नेतृत्व करताना पाहण्यास आम्ही उत्सुक झालो आहोत. नवा उत्साह, नवी जोम आणि नवी पॅशन आम्हाला नव्या मोसमात पहावयास मिळेल,’ असे डीसीचे चेअरमन व सहमालक पार्थ जिंदाल यांनी म्हटले आहे.

Advertisement

या वर्षीच्या आयपीएलआधी विशाखापटणम येथे संघाचे सराव शिबीर आयोजित करण्यात आले होते, त्यात पंतचाही सहभाग होता. दिल्लीचा पहिला सामना 23 मार्च रोजी पंजाब किंग्सविरुद्ध चंदिगडमध्ये होणार आहे.

तत्पूर्वी, पंतला बीसीसीआयने या वर्षीच्या आयपीएलमध्ये यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळण्यास मान्यता दिली होती. ‘अपघातानंतर 14 महिने रिहॅब व रिकव्हरी प्रक्रियेतून गेल्यानंतर रिषभ पूर्णपणे फिट झाल्याने आयपीएलमध्ये यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळण्यास मान्यता देण्यात येत आहे,’ असे बोर्डाने त्याच्या फिटनेसबाबत अहवाल देताना म्हटले होते. जाळ्यातील सरावात पंतचा खेळ पाहून संघाचा मेंटर रिकी पाँटिंगनेही आनंद व्यक्त केला. ‘गेल्या वर्षी आम्हाला त्याची उणीव प्रकर्षाने जाणवली होती. संपूर्ण स्पर्धाच त्याला मिस करीत होती. त्याच्या असण्याने संघाला नवी एनर्जी मिळते. तो सतत हसतमुख असतो. सरावावेळीही तो अचूक फटके मारत होता. त्यामुळे सहकाऱ्यांचे मनोधैर्य तो निश्चितच उंचावेल,’ असे पाँfिटंग म्हणाला.

गेल्या वर्षी डेव्हिड वॉर्नरने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले होते आणि संघाला नववे स्थान मिळाले होते. त्यांनी एकूण 5 विजय मिळविले तर 9 सामने गमविले. सनरायजर्स हैदराबादला शेवटचे दहावे स्थान मिळाले होते.

Advertisement
Tags :

.