रिषभ पंत आयपीएल इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू
लखनौ सुपर जायंट्सकडून 27 कोटी रुपयांना करारबद्ध
वृत्तसंस्था/ जेद्दाह, सौदी अरेबिया
भारताचा धडाकेबाज यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत हा इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला लखनौ सुपर जायंट्सने (एलएसजी) 27 कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. रविवारी जेद्दाह येथे इंडियन प्रीमियर लीगचा महालिलाव सुरू झाला.
पंत करारबद्ध होण्याच्या काही मिनिटांपूर्वी पंजाब किंग्जकडून (पीबीकेएस) 26.75 कोटी ऊपयांना करारबद्ध केला जाऊन श्रेयस अय्यर हा लीगच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू बनला होता. त्याने ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला मागे टाकले होते. स्टार्कने 24.75 कोटी रुपयांच्या विक्रमी बोलीसह अनेक वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन केले होते.
सुऊवातीला एलएसजी आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी) यांच्यात बोली युद्ध झाले, नंतर बेंगळूरने माघार घेतली. सनरायझर्स हैदराबादने नंतर या बोली युद्धात प्रवेश करून आपल्या स्फोटक फलंदाजी आक्रमणाला बळ देण्याचा प्रयत्न केला तसेच दिल्ली कॅपिटल्सने ‘राईट टू मॅच’ कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला. परंतु ‘एलएसजी’ने पंतसाठी मांडलेल्या मूल्याशी ते जुळू शकले नाही आणि त्यांचे प्रयत्न फोल ठरले. यासह ‘एलएसजी’ला शेवटी पंतच्या रुपाने वरच्या फळीतील योग्य फलंदाज, यष्टिरक्षक आणि कर्णधारपद भूषवू शकणारा खेळाडू मिळाला आहे.
पंतने 2016 पासून त्याच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. त्याला 2021 मध्ये संघाचा कर्णधार नियुक्त करण्यात आले होते आणि त्याच हंगामात त्याच्या अधिपत्याखालील संघ प्लेऑफमध्ये पोहोचला होता. इंडियन प्रीमियर लीगचा महालिलाव रविवार व सोमवार असे दोन दिवस होणार असून त्यात अनेक विक्रम मोडले जाण्याची शक्यता आहे. या लिलावाकरिता सुरुवातीच्या 1,574 नावांमधून एकूण 574 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या यादीमध्ये 208 परदेशी खेळाडू तसेच राष्ट्रीय संघातर्फे न खेळलेल्या 12 परदेशी खेळाडू आणि 318 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
चहल ‘पंजाब किंग्ज’, तर शमी ‘सनरायझर्स’कडे
दरम्यान, भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलला पंजाब किंग्जने 18 कोटी ऊपयांना करारबद्ध केले आहे. चहलसाठी आधी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आणि नंतर पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात बोली युद्ध झाले. अखेरीस त्याला पंजाबने आपल्या गोटात सामील करून घेतले. चहल हा रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा आघाडीचा बळी घेणारा गोलंदाज राहिला आहे. तसेच यापूर्वी गुजरात टायटन्सकडे राहिलेला अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सनरायझर्स हैदराबादने 10 कोटी ऊपयांना, तर दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फलंदाज डेव्हिड मिलरला लखनौ सुपर जायंट्सने 7.5 कोटी ऊपयांना विकत करारबद्ध केले आहे.
के. एल. राहुल दिल्ली कॅपिटल्समध्ये
याशिवाय भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला गुजरात टायटन्सने 12.25 कोटी ऊपयांना संघात घेतले आहे, तर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने 8.75 कोटी ऊपयांना करारबद्ध केले आहे. तसेच बहुगुणी फलंदाज के. एल. राहुलला दिल्ली कॅपिटल्सने 14 कोटी ऊपयांना घेतले आहे. त्याच्यासाठी कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर यांच्यात बोली युद्ध झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स मैदानात उतरला आणि त्यांनी या खेळाडूला आपल्या बाजूने खेचले. राहुलच्या रुपाने त्यांना सलामीवीर, कर्णधार आणि यष्टीरक्षक-फलंदाज असे अनेक पर्याय मिळाले आहेत.
पंजाब किंग्जने आणखी एक मोलाची भर टाकताना डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला 18 कोटी रुपयांना करारबद्ध करून आपला मारा धारदार बनविला आहे. याशिवाय दिल्ली कॅपिटल्सने ऑस्ट्रेलियाचा युवा स्टार जॅक फ्रेझर मॅकगर्कला राईट टू मॅच कार्ड वापरून करारबद्ध केले आहे, तर नामवंत खेळाडू डेव्हिड वॉर्नरला रविवारी कुणीही करारबद्ध केले नाही.
रिषभ पंत : 27 कोटी रुपये (एलएसजी)
श्रेयस अय्यर : 26.75 कोटी रुपये (पंजाब किंग्स)
युजवेंद्र चहल : 18 कोटी रु. (पंजाब किंग्स)
केएल राहुल : 14 कोटी रु. (दिल्ली कॅपिटल्स)
मोहम्मद शमी : 10 कोटी रु. (सनरायजर्स हैदराबाद)