For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिंकू सिंग तातडीने घरी परतला

06:09 AM Feb 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
रिंकू सिंग तातडीने घरी परतला
Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

भारताचा मध्यफळीतील धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंग तातडीने घरी परतला असून कर्करोगग्रस्त त्याच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्याला घरी परतावे लागले आहे. यामुळे तो मंगळवारी सराव करताना दिसला नाही. बऱ्याच दिवसापासून त्याचे वडील आजारी असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. यामुळे गुरुवारी तो झिम्बाब्वेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. रिंकूला या स्पर्धेत फारसे खेळायला मिळाले नाही. त्याने 5 डावांत 24 धावा जमविल्या आहेत. त्यात तो दोनदा नाबाद राहिला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.