महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुंडकारांना मिळवून देणार हक्काचे घर : मुख्यमंत्री

10:06 AM Nov 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : मुंडकारबांधवांना वर्षानुवर्षे हक्काच्या घरांसाठी झगडावे लागत आहे. मुंडकारप्रकरणे अनेकवर्षांपासून खितपत पडल्याने अशी प्रकरणे 30 दिवसांत निकाली काढण्यासाठी आपण लवकरच अध्यादेश काढणार आहे. त्यामुळे प्रत्येक मुंडकाराला हक्काचे घर मिळवून दिले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अर्ज सादर केल्यानंतर 30 दिवसांच्या आत मुंडकारांना घराचे हक्क देण्याच्या निर्णयाची कार्यवाही व्हावी यासाठी कायदेशीर तरतुदी आवश्यक होत्या. या तरतुदींसाठी लवकरच अध्यादेश काढला जाईल. दक्षिण व उत्तर गोवा या जिह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष आदेश काढला असून, मुंडकारी प्रकरणे निकालात निघावीत, यासाठी आराखडा तयार करण्याबाबत आदेशाद्वारे सांगण्यात आले आहे. महसूल अधिकाऱ्यांनी मुंडकार प्रकरणाचा पूर्ण अभ्यास करावा. प्रत्येक कामांचा पाठपुरावा करण्याबरोबरच साप्ताहिक अहवालही सादर करावा, असे कळविण्यात येणार आहे.

Advertisement

अधिकारी, कर्मचारी शनिवारीही काम करणार

Advertisement

उत्तर व दक्षिण गोवा या दोन्ही जिह्यांत मुंडकारांची हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत. संबंधित जिह्यातील दोन्ही अधिकाऱ्यांनी प्रलंबित मुंडकाऱ्यांच्या खटल्यांवर सुनावणी घेण्यासाठी महसूल अधिकारी व कर्मचारी यांना शनिवारीही कामावर बोलवावे, असे आपण निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article